नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १५ दिवस बंगालमध्ये मुक्काम ठोकण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. त्यावर तृणमुल काँग्रेसने बंगाल पर्यटकांचे खुल्या दिल्याने स्वागत करतो. त्यांनी बंगालमधील काही मासांहारी पदार्थ चाखून पहावेत असा टोला मारला आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरला आहे. भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी बंगालमध्ये १५ दिवस घालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणुकीत शाकाहार आणि मासांहार यावरुन तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सत्तेवर आल्यास मासे आणि मासांहारी पदार्थासह बंगाली खाद्य संस्कृतीवर निर्बंध घालेल असे विधान केले होते. त्यातच शाह यांनी बंगालमध्ये १५ दिवस मुक्काम ठोकण्याची घोषणा केल्यानंतर तृणमुल काँग्रेसने एक्सवर पोस्ट केली आहे. टीएमसीने म्हटले आहे की, बंगाल पर्यटकांचे खुल्या दिल्याने स्वागत करतो. पश्चिम बंगालमधील काही मासांहारी पदार्थ चाखून पाहण्याची शिफारस केली आहे. आम्ही शिफारस करतो की मुरी घोंटो, पाबडा माचेर झाल, इलीश भापा, चिंगरी मलाई करवी, भेतकी पातुरी, कोशा मंगशो. तुमचा मुक्काम आनंद आहे. (Trinamool offers non-vegetarian dishes to Amit Shah)
बिहार सरकारने खुल्या मांस विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश काढला आहे. त्यावर ममतांनी एका जाहीर सभेत, बिहारच्या उप मुख्यमंत्र्यांनी खुल्या बाजारात मासे आणि मांस विकता येणार नाही असे ठामपणे सांगितल्याचा एक अहवाल माझ्या वाचनात आला. हे जनविरोधी आणि निंदनीय आहे. प्रत्येकजण शॉपिंग मॉल्समध्ये मांस आणि मासे विकू शकतो का? रस्त्यांवर विक्री करणाऱ्या मासे आणि मांस विक्रेत्यांचे काय होइल असा सवाल केला आहे. (Trinamool offers non-vegetarian dishes to Amit Shah)
दरम्यान ममतांच्या आरोपाचे खंडन करताना भाजप अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी बंगालमधील लोकांना त्यांच्या आवडीचे अन्न खाण्याचे स्वातंत्र्य आहे आणि पक्षाचा केवळ गोमासांच्या खुल्या विक्रीला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तृणमुलच्या ऑफरला अमित शाह काय उत्तर देणार याकडे बंगालवासियांचे लक्ष लागले आहे. (Trinamool offers non-vegetarian dishes to Amit Shah)