कोल्हापूर : प्रतिनिधी : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (नवी दिल्ली) यांच्या वतीने हैदराबाद येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठात १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा २०२५-२६ पार पडली. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा १५ सदस्यांचा संघ सहभागी झाला. शिवाजी विद्यापीठाच्या संघाला मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सईद ऐनुल हसन यांच्या हस्ते तृतीय क्रमांकासाठीचा चषक आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. (Shivaji University Team Secures Third Place in National Qawwali Competition)
या संघात अभय विजय हावळ, मुनाफ रियाज अहमद खान, सूरज महादेव कांबळे, स्नेहल सत्येंद्रकुमार चव्हाण, किरण सूर्यकांत भाकरे, तनुजा रावसाहेब कांबळे, मृण्मयी सदाशिव पांचाळ, सुधांशू गौतम तांबे, विपश्यना भिकाजी कामत आणि निहाल अलनिसार रुकडीकर यांचा समावेश होता. संघाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश देशमाने आणि सुमंत कुलकर्णी यांनी काम पाहिले. संघासोबत वादक साथीदार म्हणून देशमाने यांच्यासह कौस्तुभ शिंदे, प्रेम भोसले यांनी काम केले. संघव्यवस्थापक म्हणून चिखली येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्टस् अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे देवेंद्र श्रीमंत शिंदे आणि महिला संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या अधीक्षक सुरेखा आडके यांनी काम पाहिले. ( Shivaji University Team Secures Third Place in National Qawwali Competition)
विजेत्या संघाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे यांनी अभिनंदन केले आहे.