८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’

The Great Green Wall

हवामान बदलाशी लढण्यासाठी, जमिनीची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अफ्रिकेत ८००० किलोमीटर लांबीची वृक्षांची भिंत उभारली जात आहे. चीनच्या महाकाय भिंतीनंतर हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा पर्यावरण प्रकल्प कार्यरत आहे. सेनेगलच्या आटलांटिक किनाऱ्यापासून ते तांबड्या समुद्रापर्यंत ‘ग्रेट ग्रीन वॉल’ हा प्रकल्प पर्यावरणवादी चळवळीतील एका मैलाचा टप्पा ठरणार आहे.

सहारा वाळवंटाला लागून असलेल्या साहेल या विस्तीर्ण अर्ध शुष्क प्रदेशात ही ग्रीन वॉल उभारण्यात येणार आहे. नापिक जमिनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा प्रकल्प हातात घेतला आहे. हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे गवताळ प्रदेश, शेतजमीन आणि पानथळ जमिनीचे पुनरूज्जीवन होणार आहे. दरवर्षी लाखो झाडे लावून त्याचे संगोपन करण्यासाठी हजार हात कार्यरत आहेत. (The Great Green Wall)

काय आहे हा प्रकल्प

अफ्रिकन युनियनने २००७ मध्ये ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पास सुरुवात केली. २० हून अधिक अफ्रिकन देश या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. तसेच जगभरातील आंतरराष्ट्रीय संस्था, बँका, पर्यावरण संस्थांनी या प्रकल्पाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे. १० कोटी हेक्टर नापीक जमिनीचे पुनरुज्जीवन करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प सहारा वाळवंटाला दक्षिणेकडील अधिक हिरव्यागार सव्हाना प्रदेशांपासून वेगळा करणारा आहे. आठ हजार किलोमीटर लांब आणि १५ किलोमीटर रुंद असा वृक्षांचा सलग पट्टा करण्याची मुख्य संकल्पना होती. पण कालांतराने शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवाद्यांच्या लक्षात आले की वृक्षांची एक ओळ लावण्यापेक्षा जमिनीचे पुनरुज्जीवन करणे प्रभाव ठरले. त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार जंगले, गवताळ प्रदेश, पानथळ जागा, शेतजमीन आणि देशी वनस्पतीचे पुनरुज्जीवन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. (The Great Green Wall)

प्रकल्पाची गरज काय?

सोहेल प्रदेशाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी, दीर्घकाळचा दुष्काळ, जमिनीचा ऱ्हास आणि हवामान बदल यांच्या एकत्रित परिणामांना तोंडण्यासाठी हा प्रकल्प आहे. ‘द ग्रेट ग्रीन वॉल’ ही जमिनीची सुपिकता निर्माण करणारा आहे. तसेच जमिनीची जलधारणा क्षमता सुधारणा आहे. वनस्पतींचे आच्छादन वाढवून शेतजमिनीला अधिक उत्पादनक्षम बनवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुष्काळ आणि भूकबळीचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे लोक गाव सोडून जाण्यापासून परावृत्त होणार आहे. (The Great Green Wall)

२०३० पर्यंत उपक्रमाचे उद्दिष्ट.

गेट ग्रीन वॉल हा उपक्रम २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. नावाप्रमाणे ग्रेट ग्रीन वॉल ही संपूर्ण खंडात पसरलेली झाडांची एक सलग रांग नाही. ८००० हजार किलोमीटर मार्गावर येणाऱ्या स्थानिक परिस्थितीनुसार हा प्रकल्प राबवला जात आहे. काही भागांमध्ये देशी झाडे लावली जातात. इतर भागात शेतकरी नैसर्गिकरित्या पुन्हा उगवणाऱ्या वनस्पतींचे संरक्षण करतात. गवताळ प्रदेशांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यामुळे जमिनीचा कस वाढला आहे. पाणी साठवण्याची क्षमताही वाढली आहे. त्यामुळे शाश्वत शेती निर्माण होत आहे. सेनेगलने लाखो झाडे लावली आहेत. इथोओपियाने मोठ्या प्रमाणांवर लाखो हेक्टर जमिनीचे पुनवर्सन केले आहे. नायजेरिया, नायजर आणि इतर देशांनी देखील भू व्यवस्थापन पद्धतीचा विस्तार केला आहे.

Related posts

अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

जम्मूच्या तावी नदीकिनारा प्रकल्पावरून वाद

डीआर काँगोचा समर्थक लुमुम्बा वेआ