अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

African country Cape Verde

फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता लेओनिल मेस्सीच्या अर्जेटिनाला केप वर्दे या देशाने कडवी झुंज दिली. मेस्सीने या सामन्यात वर्ल्डकपमधील विसावा गोल केला. त्यानंतर केप वर्देने बरोबरी साधली. त्यानंतर लिसांद्रो मार्टिनेझने गोल करत अर्जेटिना आघाडीवर नेले. . आणि नुना द कोस्टाने एक सुरेख गोल करत केप वर्देला बरोबरी साधून दिली. जादा वेळेत केला. रोमरोच्या गोलने सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत केप वर्देचा गोलरक्षक वेझिन्हाने अप्रतिम गोलरक्षण केले.  मेस्सीच्या संघाला केप वर्देने अक्षरशा पळवले. चुरशीच्या सामन्यात पराभव झालेल्या या देशाने जगभरातील फुटबॉल शौकिनांची मने जिंकली. सामन्यानंतर मेस्सीने आम्ही शेवटपर्यंत लढलो या प्रतिक्रियेवरुनच केप वर्देने किती कडवी झुंज दिली हे समजून येते.  पाच लाख ३० हजार लोकसंख्येचा हा देश कुठे आहे याचा आपण आढावा घेऊ. (African country Cape Verde)

सतीश घाटगे

कुठे आहे केप वर्दे हा देश

केप वर्दे हे एक ज्वालामुखी बेट आहे. अफ्रिकेच्या समुद्रातील अटलांटिक महासागरात हा देश असून त्यांचे क्षेत्रफळ ६०० ते ८५० किलोमीटर इतके आहे. महाकाय अफ्रिका खंडातील पश्चिमेकडे नकाशावर एका छोट्या बिंदू प्रमाणे हा देश आहे. २०२६ ला या देशाची लोकसंख्या अवघी ५ लाख ३० हजार इतकी आहे.

पोर्तुगीजांनी शोधून काढले हे बेट….

१५ व्या शतकात हे बेट निर्जन होते. पार्तुगीजांनी हे बेट शोधून काढले आणि सर्वप्रथम तिथे वस्ती केली. उष्णकटिबंधातील युरोपांची ही पहिली वस्ती होती. पोर्तुगील भाषेत या बेटाला काबो वर्डे, केप वर्डेयन, काबु वर्डी असे संबोधले जाते. काबो वर्डे असं इंग्रजीत म्हणतात. १६ आणि १७ व्या शतकात व्यापारी दृष्ट्या या बेटाचे महत्व वाढले आणि भरभराट झाली. रम, सोने, हस्तीदंती वस्तूंचा व्यापार मोठा चालायचा. अफ्रिकन गुलामांचाही व्यापार चालायचा. व्यापारी जहाजांचे विश्रामाचे ठिकाण म्हणून हे बेट प्रसिद्ध झाले. (African country Cape Verde)

केप वर्दे देश कधी स्वतंत्र झाला?

केप वर्दे हा देश परकीय देशांच्या नियंत्रणात सुटला आणि १९७५ ला स्वतंत्र झाला. अफ्रिकेत लोकशाही रुजताना त्रास होत असताना १९९० पासून एक स्थिर लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटन आणि परदेशी गुंतवणूकीवर अवलंबून आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला हा अफ्रिकन देश आहे. मुळचे अफ्रिकन आणि पोर्तुगीज, अमेरिका वंशाचे लोकांचे वास्तव्य या देशात आहे. पोर्तुगाली ही देशाची अधिकृत भाषा आहे. पण आता केप वर्डेयन क्रियोल ही बोली भाषाही बोलली जाते. सॅटियोगो ही देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. साओ विसेंट, सॅंट एंटाओ, फोगो, साल, मिंडलो, प्रिया, एस्पार्गोस, असोमाडा ही प्रमुख शहरे आहेत. (African country Cape Verde)

Related posts

८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’

गर्व से कहो – खड्डा है !

मंदिरे पाडून लुटणारे आणि बांधून लुटणारे!