Meteorite auction : दगडाच्या तुकड्याचा ४४ कोटीला लिलाव

Meteorite auction

न्यू यॉर्क : पृथ्वीवर सापडलेला मंगळाचा सर्वांत मोठा तुकडा समजल्या जाणाऱ्या उल्कापिंडाचा लिलाव तब्बल ५.३ दशलक्ष डॉलर्सला (४४ कोटी) लिलाव झाला. या उल्कापिंडाच्या लिलावाने नवा विक्रम नोंदवला आहे. या उल्कापिंडाचे वजन असलेल्या ५४ पौंड (२४.५ किलो) वजनाच्या मंगळाच्या या तुकड्याचा लिलाव सोथेबी येथे झाला. ‘रॉयटर्स’ने हे वृत्त दिले आहे. (Meteorite auction)

लिलावात बोली बोलणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. गेल्या बुधवारी हा लिलाव झाला. या उल्कापिंडाला ‘एनडब्ल्यूए १६७८८’ असे नाव देण्यात आले होते. याची बोली ऑनलाइन आणि फोनवरून झाली. तब्बल १५ मिनिटे त्यासाठी जगभरातील बोलीधारकांनी बोली लावली होती. विशेष म्हटजे ही बोली अटीतटीची झाल्याचे सांगण्यात आले. (Meteorite auction)

‘‘ मंगळाच्या पृष्ठभागावरून तुटलेला हा एक आश्चर्यकारक उल्कापिंड आहे,’’ असे सोथेबीच्या उपाध्यक्षा आणि विज्ञान व नैसर्गिक इतिहासाच्या जागतिक प्रमुख कॅसँड्रा हॅटन यांनी लिलावापूर्वी सांगितले.

हा तुकडा नोव्हेंबर २०२३ मध्ये सहारा वाळवंटात नायजरच्या दुर्गम अगाडेझ प्रदेशात एका शिकाऱ्याला सापडला होता.

‘‘हे काहीतरी खास असावे, असे तेथील लोकांना वाटले. त्यानंतर काहींच्या मदतीने ते हा तुकडा घेऊन प्रयोगशाळेत आले. तेथे तुकड्याचे नमुने तपासण्यात आले. त्यावेळी आम्हाला ‘अरे देवा, हा तर मंगळाचा तुकडा आहे,’ असे लक्षात आले.  हा केवळ मंगळग्रह नाही, तर तो या ग्रहावरील मंगळाचा सर्वांत मोठा तुकडा आहे,’’ असे हॅटन यांनी सांगितले. (Meteorite auction)

सुमारे ५ दशलक्ष वर्षांपूर्वी, एक लघुग्रह किंवा धूमकेतू मंगळावर इतक्या जोरात आदळला की खडक आणि इतर कचरा अवकाशात पसरला. अवकाशातून १४० दशलक्ष मैल प्रवास करत तो धडधडत पृथ्वीवर येऊन आदळला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या तुकड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो याआधी सापडलेल्या मंगळग्रहाच्या उल्कापिंडाहून ७० टक्क मोठा आहे. जगभरात मंगळाचे असे केवळ चारशे उल्कापिंड सापडले आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर