काँग्रेसने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला : अनंत गाडगीळ

The Congress restored the Somnath Temple

 जमीर काझी :  मुंबई :  गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार,  पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करण्यात येत असलेल्या स्तुतीसुमनाबद्दल प्रदेश  काँग्रेसचे जेष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी कडाडून हल्ला चढविला आहे. सोमनाथ मंदिरांची कल्पना सरदार पटेल यांची तर कृती मुन्शी-गाडगीळांची आहे. यामध्ये मोदीजी येतातच कुठे ?असा खोचक सवाल  त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसने हिंदूंचे मंदिर उभारल्याच्या इतिहासाचा भाजपला विसर पडावा याचे आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले. (The Congress restored the Somnath Temple)

अनंत गाडगीळ म्हटले आहे की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल यांनी  व्यक्त केला. त्यांच्या पुनर्बांधणीची जबाबदारी गुजरातचे तत्कालीन ज्येष्ठ नेते कन्हैयालाल मुन्शी व तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ या दोघांवर सोपवत असल्याचे त्यांनी   पंडित जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांशी चर्चा करून घोषित  केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनीं उदघाटनही केले होते. हा सर्व इतिहास विसरत, पंतप्रधान व काही मुख्यमंत्री लेख व कार्यक्रमाद्वारे आपणच जणू मंदिराचे निर्माते आहोत असे गेल्या काही दिवसापासून भासवत आहेत. (The Congress restored the Somnath Temple)

काँग्रेस हा अल्पसंख्यांकांचा लांगुनचालन करणारा पक्ष अशी सात्यत्याने टीका करणाऱ्या भाजपला, याच काँग्रेसने हिंदूंचे मंदिर उभारल्याच्या इतिहासाचा विसर पडावा याचे आश्चर्य वाटते.असे सांगून गाडगीळ यांनी म्हटले आहे की,या  मंदिर पुनर्बांधणीशी संबन्धित सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित करीत आहोत असा निरोप मंदिर व्यवस्थापनाकडून काकासाहेब गाडगीळ यांचे नातू म्हणून मला  १५ दिवसापूर्वी देण्यातही आला होता. आमचा  पत्ता, फोन नंबर इ सर्व तपशील गुजरात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता. मात्र आजच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही आपणास देण्यात आले नसल्याचे गाडगीळ यांनी उघड केले आहे’. सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्यांकडून मात्र आजचा कार्यक्रम उरकण्यात येत आहे अशी उपरोधक टीकाही गाडगीळ यांनी केली आहे. (The Congress restored the Somnath Temple)

Related posts

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!