दमसा ग्रंथ पुरस्कार जाहीर; २४ मे रोजी पुरस्कार वितरण

Damsa Granth Award Announced

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२५   मधील ग्रंथ पुरस्कारासाठी रवींद्र ठाकूर, धनंजय बिजले, शशिकांत चौधरी, निलांबरी कुलकर्णी , चंद्रकांत बाबर आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.  रविवारी २४ मे  रोजी  सकाळी साडेदहा वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, शिवाजी  उद्यम नगर,कोल्हापूर पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. (Damsa Granth Award Announced)                                  

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी- १. देवदत्त पाटील पुरस्कार ( कादंबरी) विभागून -धरणीमाय- शशिकांत चौधरी, भिंगुळवाणे दिवस -रमेश साळुंखे , २. शंकर खंडू पाटील पुरस्कार: स्त्रीप्रधान सर्वेपि सुखिन सन्तु – निलांबरी कुलकर्णी   (कथासंग्रह),  ३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार: दाही दिशा -रवींद्र ठाकूर ( कादंबरी),  ४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: महामुद्रा- धनंजय बिजले ( संकीर्ण), ५. शैला सायनाकर पुरस्कार:  माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ-चंद्रकांत बाबर  (कवितासंग्रह), ६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- घुंगुरमाळा- महानंदा मोहिते  आणि  ७. बालवाड्मय पुरस्कार-  श्री संवाद-श्रीयांश हराडे . (Damsa Granth Award Announced)

विशेष पुरस्कार :  १. ऋजुता माने पुरस्कार – थिजलेल्या माणुसकीचा गहिवर- सोनिया पाटील,२. कर्तृत्वाचा एक शोध,-रवींद्र बेडकीहाळ, ३. गुलामी जिणं -रमेश जावीर, ४. जगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज- मधुकर जाधव, ५. चलबट – अर्जुन व्हटकर, ६. राजधुरंदर ताराराणी -राजेंद्र घाडगे, ७. अर्थतरंग -संजय ठिगळे, ८. कोलाहालची क्षणचित्रे -लवकुमार मुळे, ९. फक्कड सचिन अवघडे, १०. घनघोर काळीजभर -रवी बावडेकर, ११. तू ही गोष्ट सांगायला नको होती – सुनील साळुंके, १२. वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन -सिद्धार्थ कांबळे, १३. मी चंदन व्हाया बघतो -सुधाकर इनामदार, १४. स्त्री क्षेत्र ऋतुक्षेत्र अम्बुबीजानाम्- दिपाली घाडगे, १५. अंतरंग शब्दाचे – संजय वारके, १६. निळी सावळी नव्हाळी-स्वाती पाटील, १७. सायतारे -प्रकाश कुलकर्णी, १८.काठावरच्या चेह-यांच्या कथा – सुरज चौगुले १९. महात्मा बसवेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांचे सामाजिक चिंतन – चारुदत्त कासार. (Damsa Granth Award Announced)

     दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२५  या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून भीमराव धुळूबुळू, प्रा. दि.बा.पाटील, गौरी भोगले,पाटलोबा पाटील  यांनी काम पाहिले.

    पुरस्कार वितरण समारंभ रविवार २४ मे   रोजी सकाळी साडेदहा वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, शिवाजी  उद्यम नगर,कोल्हापूर  येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे  कार्यवाह डॉ.विनोद कांबळे यांनी कळविले आहे. (Damsa Granth Award Announced)

Related posts

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!