मुंबई : प्रतिनिधी : हिंदी भाषा सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकमत झाले आहे. हिंदी सक्तीविरोधात वेगवेगळे मार्चा न काढता एकत्र मोर्चा निघणार आहे. पाच जुलै रोजी गिरगांव चौपाटीवरुन हा मोर्चा निघणार आहे. (Thackeray brother’s march)
राज्यात त्रिभाषा सुत्रावरुन पहिली पासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. त्याला मनसेचे राज ठाकरे यांनी विरोध केला. हिंदी भाषा सक्तीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाने विरोध दर्शवला आहे. तरीही राज्य सरकार त्रिभाषा सुत्रावर ठाम आहे.
हिंदी भाषा सक्ती विरोध करण्यासाठी राज्य ठाकरे यांनी सहा जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली. तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली. सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख पाच जुलैला निश्चित केली. दरम्यान हिंदी सक्ती भाषेवरुन दोन वेगवेगळे मोर्चे निघणार असल्याने चित्र वेगळे दिसणार असल्याने एकच मोर्चा निघावा यासाठी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले. (Thackeray brother’s march)
या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख जाहीर केल्याने आम्हाला त्याची माहिती नव्हती. दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क साधून एकाच प्रश्नांवर वेगवेगळे मोर्चे काढणे हे बरोबर दिसणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसेनेने सात जुलैचा मोर्चा रद्द करुन पाच जुलै रोजीच मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे. महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र! राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटोही टाकला आहे. (Thackeray brother’s march)
असे राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आमचा हिंदीला विरोध नाही, प्राथमिक शिक्षणात हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका एकच आहे.
खासदार राऊत म्हणाले, मोर्चाबाबत दोघांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. ती दोघांच्याही आणि महाराष्ट्रांच्या सोयीची आहे. त्यामुळे आता पाच जुलैला एकत्र मोर्चा निघणार आहे. दोन्ही ठाकरे मनाने एकत्र आले आहेत. आता मराठी माणसासाठी लढा उभा करण्याची गरज दोघांनाही वाटत आहे. लढ्याचे नेतृत्व ठाकरेच करणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षाची हिंदी भाषा सक्तीविरोधात तीच भूमिका आहे. त्यांनाही मोर्चासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. (Thackeray brother’s march)