धर्मेंद्र प्रधानांचे हार घालून स्वागत करताना लाज कशी वाटली नाही?

Gaurav Gogoi's criticism of the government

नवी दिल्ली : लोकसभेत भाजप सरकारने आज मंगळवारी परीक्षा सुधारणा विधेयक मांडले. त्यावर चर्चा करताना काँग्रेसने विधेयकांवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या धोरणामुळे २१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्या आणि त्यांचं हार घालून स्वागत करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार गौरव गोगई यांनी लोकसभेत केला. (Gaurav Gogoi’s criticism of the government)

सुधारणा विधेयक हा देखावा

परीक्षा सुधारणांवरील चर्चेत काँग्रेसच्या गौरव गोगई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार शिक्षण विभागाबाबत गंभीर नाही, त्यांना सुधारणा करण्याची इच्छा दिसत नाही. जे सुधारणा विधेयक आणलं जात आहे तो देखावा आहे अशी टीका केली. २०२४ मध्ये हे विधेयक आणलं गेलं होतं. त्यावेळी युजी नीटच्या परीक्षांबाबत लोकांच्या मनात चिंता होती. आज असं सांगितले जाते की एक ऐतिहासिक पाऊल आहे वैगेरे सांगितले गेले. परीक्षेत पेपरफुटी होणार नाही असे सांगितले गेले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Gaurav Gogoi’s criticism of the government)

पेपरफुटीतील ४५ आरोपींना जामीन

गौरव गोगई यांनी नीट पेपरफुटीतील आरोपींचा पाढा वाचून दाखवला. ते म्हणाले, २०२४ च्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात ४५ आरोपी होते. त्यापैकी ४४ आरोपींना जामीन दिला गेला आहे. एप्रिल २०२५ मध्ये या प्रकरणाचा मास्टरमाईंड पकडला गेला. त्यालाही जामीन दिला गेला. मे २०२५ मध्ये रणजीत कुमार बारूआंना जामीन मिळाला. पंकज कुमार हा आरोपी होता. मोबाईलवरुन पेपर पाठवायचा. त्यालाही जामिन दिला गेला. जो कायदा मांडला गेला आणि जे सुधारणा विधेयक आणलं जात आहे ते तुमच्या अपयशाचं स्मारक आहे, अशी टीका गौरव गोगई यांनी केली.

पेपरफुटी झाल्याच नसल्याचा प्रधानांचा आव

२०२४ आणि २०२६ मध्ये झालेल्या पेपरफुटीच्यावेळी धर्मेंद्र प्रधान मंत्री होते. पण तेच प्रधान म्हणत होते की काहीच घडलेले नाही. २०२६ मध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने २१ मुलांनी आत्महत्या केला. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर ते संसदेत आल्यावर तेव्हा त्यांचे हार घालून तुम्ही स्वागत केले. जसे ते पाकिस्तानातून लढाई जिंकून आले अशी टीका गौरव गोगई यांनी केली. (Gaurav Gogoi’s criticism of the government)

गोगईंचा प्रधानांवरही निशान

गौरव गोगई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाना साधला. पहिल्या कॅबिनेट बैठकीत शिक्षण धोरण कसे सुधारायचे, पेपर फोडणारे कोचिंग सेंटर माफीयावर या चर्चा न करता पंतप्रधान म्हणतात इन्स्टाग्रामवर लक्ष द्या असे सांगत होते. पंतप्रधान उच्चस्तरीय समितीची वल्गना करत आहेत ती समिती दोन वर्षापूर्वी स्थापित झाली आहेत. जर या समितीने योग्य काम केले तर मग पेपर का फुटला असा सवाल गोगई यांनी केला. (Gaurav Gogoi’s criticism of the government)

Related posts

निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी

पोलिसांची व्हॅन अडविणाऱ्या रिया अहिरेला धमक्या आणि शिवीगाळ

सर्वोच्च न्यायालयाचे १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश