कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात वैद्यकीय क्षेत्रासंबधी संस्था सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभागाची परवानगी लागते. परवानगीचे प्रोसिडिंग करावे लागते. आरोग्य विभागाने परवानगी दिली नसतानाही राज्यात नवीन २५० नर्सिग कॉलेजला परवानगी दिली आहे. नर्सिंग् कॉलेजच्या परवानगीत गौंडबंगाल दिसत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. (Nursing collage)
खासदार पवार आज कोल्हापूर दौऱ्यात आले होते. त्यांनी हिंदी सक्ती, ठाकरे बंधू, आणीबाणी या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. हिंदी भाषेला विरोध नाही पण पण पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याचा विरोध असल्याचे पवारांनी सांगितले. हिंदी सक्तीविरोधात निघणाऱ्या मोर्चातील सहभागाबाबत पवार म्हणाले, हा विषय राज्याचा हिताचा असेल तर सहभागी होता येईल. पण मोर्चात कोण कोण येत नाही हे पाहतोच ही भाषा बरोबर नाही. पण कोणी सांगतो म्हणून सहभागी होता येणार नाही. तरीही मुंबईत गेल्यावर ठाकरे बंधूंची भूमिका समजावून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. (Nursing collage)
ठाकरे बंधू एकत्र येत आहे यावर बोलताना ते म्हणाले, राजकारणात मतभेद विसरुन एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगले आहे. त्यात दोन भाऊ मतभेद विसरुन एकत्र येत असतील ते ते चांगले आहे. पण ते एकत्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. जनसुरक्षा कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या समितीत आमच्या पक्षाचे जयंत पाटील आहेत. कुणालाही जुजबी कारणांवरुन अटक करण्याचा अधिकार आहे. या संदर्भात मुंबईत बैठक आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार असून त्याला आमचा पाठिंबा आहे. (Nursing collage)
अमेरिका छोट्या देशांवर आपली भूमिका लादत आहे हे योग्य नाही असे सांगून पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. इराण इस्त्रायल युद्धात ट्रम्प युध्दाची घोषणाही करतात आणि युद्धबंदीची घोषणा करतात आणि त्याचे श्रेय स्वत: घेतात. त्यांच्याविषयी नाराजी आहे. भारताने इराण इस्त्रायल युद्धासंबधी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. केंद्रातील सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही. भारताची भूमिका आखाती देशांना सांगितलेली नाही, असेही पवार म्हणाले.
एआय तंत्रज्ञानामुळे उसाच्या उत्पादनात ५० टक्के वाढ होणार नसून ती ३० ते ४० टक्के वाढ होईल. पण पाणी आणि खतांच्या वापरात ३० टक्के बचत झाल्यावर उत्पादन खर्च कमी येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आणीबाणीवर बोलताना पवार म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली पण जनमनाचा कानोसा घेतल्यानंतर त्यांनी देशाची माफीही मागितली. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत इंदिरा गांधीचा पराभव झाला. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनतेने त्यांना पुन्हा सत्ता दिली याकडेही पवारांनी लक्ष वेधले. लोकशाहीत हल्ली विरोधकांना स्थान दिले जात नाही. लोकसभेत संवाद हवा असतो. पण हल्ली सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये डायलॉग दिसून येत नाही, असेही पवार म्हणाले. आज भाजपवाले टीका टिपण्णी करतात याला अर्थ नाही. इंदिरा गांधी यांनी माफी मागितली की नाही हे पाहावे आणि पुन्हा सत्ता दिली की नाही हे सुद्धा भाजपने पहावे
राहूल गांधी यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या परफॉर्म्सबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांच्या पदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडताना अन्य सदस्यांना संधी दिली पाहिजे. पण ते बोलले नाही की विरोधी पक्षेनेते काहीच बोलले नाही अशी टीका होते. पण राहूल गांधी जी भूमिका मांडतात ती स्पष्ट मांडतात असेही पवार म्हणाले.