Terror attack in J&K: दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

Terror attack in J&K

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन व्हॅली परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे वीसवर पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघा पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. तर पनवेल येथील माणिक पटेल व एस. भालचंद्रराव हे  जखमी झाले आहेत. (Terror attack in J&K)

हल्ल्याच्या काही तासांनंतर, सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. सर्व त्या उपाययोजना करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले.

पहलगाम हे ‘मिनी-स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. ते सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याचे आवाज ऐकू आले. त्यामुळे या भागात तातडीने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. (Terror attack in J&K)

महाराष्ट्रातील दोघा पर्यटकांचा मृत्यू

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात महाराष्ट्रातील दोघे पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत तर दोघे जखमी झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर ट्विट करून दिली आहे. 

हल्ल्यात दिलीप डिसले, अतुल मोने हे दोघे ठार झाले आहेत तर पनवेल येथील माणिक पटेल व एस. भालचंद्रराव हे  जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी  एक्स वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’ मी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली . त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.  जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

या ठिकाणी केवळ पायी किंवा घोड्यावरूनच जाता येते. त्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे. तसेच काही जखमींना स्थानिक लोकांनी त्यांच्या घोड्यांवर बसवून खाली आणले आहे.

अधिकाऱ्यांनी पर्यटक जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, परंतु त्यांची संख्या अद्याप समजलेली नाही.

पहलगाम येथील रुग्णालयातील एका डॉक्टरने पीटीआयला सांगितले की, १२ जखमी पर्यटकांना तेथे दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. (Terror attack in J&K)

‘‘या भ्याड दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडणार नाही. पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या सहवेदना. या भ्याड दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू. त्यांचे कठोर परिणाम त्यांना भोगावे लागतील.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

या भ्याड हल्ल्याचा जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ल यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ही घटना धक्कादायक आहे.

‘‘ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. आमच्या पाहुण्यांवरील हा हल्ला घृणास्पद आहे. हा अमानुष हल्ला आहे. त्याचा निषेध करावा तेवढे थोडेच आहे. त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या सहवेदना आहेत. मी ताबडतोब श्रीनगरला परत विमानाने येत आहे, ’’ असे त्यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे. (Terror attack in J&K)

हेही वाचा :
रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी
पत्नीने केले ओम प्रकाशांवर बारा वार

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या