पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड

Suvendu Adhikari Vidhimandalachaya Netepadhi Selection

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता संपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुरेंदू अधिकारी यांची विधानसभा गटनेतेपदी निवड केली. अधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह गृहखातेही त्यांच्याकडे दिले जाणार असल्याची चर्चा आहे. (Suvendu Adhikari Vidhimandalachaya Netepadhi Selection)

मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर होते. अमित शाह यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला. या आधी २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये अधिकारी यांनी ममतांना हरवले होते. २०२१ ते २०२६ या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दोन उपमुख्यमंत्री पदेही निर्माण केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी अभिनेत्री रुपा गांगुली यांचे नाव आघाडीवर आहे. (Suvendu Adhikari Vidhimandalachaya Netepadhi Selection)

सुरेंदू अधिकारी हे तृणमुल काँग्रेसचे खासदार होते. पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही म्हणून काम केले आहे. या निवडणुकीत ममता यांना हरवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणूक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. भाजप आणि तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडे होत आहेत. त्यातच अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर सुरेंदू अधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. (Suvendu Adhikari Vidhimandalachaya Netepadhi Selection)

Related posts

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ