टीव्हीके विजय थलपतीला काँग्रेस,कम्युनिस्टांची साथ

TVK Receives Support from Congress and Communists

चेन्नई : तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने ११८ आमदारांची मॅजिक फिगर गाठली आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. आता दोन डाव्या पक्षांनी विजय थलपतींना पाठिंबा दिल्याने तामिळनाडूत सत्ता स्थापनेचे गणित जुळले आहे. (TVK Receives Support from Congress and Communists)

तामिळनाडूत टीव्हीके पक्षाला सर्वात जास्त १०८ जागा मिळाल्या आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाच्या पाच आमदारांनी टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपती यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर भेट घेतली. पण त्यांनी ११८ आमदारांच्या सह्या आणण्यास सांगितल्या. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. (TVK Receives Support from Congress and Communists)

दुसरीकडे तामिळनाडूतील कट्टर प्रतिस्पर्धी द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे टीव्हीकेच्या १०८ आमदारांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. राज्यपाल राजेंद्र आर्वेकर यांच्याविरोधात टीव्हीकेने आंदोलन केले. दरम्यान टीव्हीकेने डाव्या पक्षासह छोट्या पक्षाशी बोलणी सुरू केली. डीएमकेचे मित्र पक्ष असलेल्या सीपीएम आणि सीपीआय आणि विदुथलाई चिरुथैगल काची यांनी बैठका घेऊन टीव्हीकेला पाठिंबा दिला. त्यामुळे ११८ चा बहुमताचा आकडा गाठला आहे. (TVK Receives Support from Congress and Communists)

Related posts

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ