दहावीचा निकाल ९२ टक्के; दोन टक्के निकाल घसरला

Find out 92 percent of the tenths

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दोन टक्के निकाल कमी लागला आहे. बारावीप्रमाणे कोकण विभागाने दहावी परीक्षेतही बाजी मारली आहे. कोकण विभागातून ९७.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असून राज्यात ९४ टक्के विद्यार्थींनी पास झाल्या आहेत. (Find out 92 percent of the tenths)

छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल कमी लागला आहे. या विभागातील ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८९.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.४० टक्के जास्त आहे. वीस विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. (Find out 92 percent of the tenths)

महामंडळाने राज्याचा निकाल अकरा वाजता जाहीर केला. तर ऑनलाईन निकाल साडेअकरा वाजता लावला. यापूर्वी हा निकाल एक वाजता लागत होता. साडेअकराला ऑनलाईन निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. सोशल मिडियावर अभिनंदनाचे स्टेटस् झळकले. (Find out 92 percent of the tenths)

Related posts

ऑलिव्ह रिडले कासवांची १.६५ लाख पिल्ले समुद्रात

दहापैकी चार विद्यार्थ्यांचा बारावीपूर्वीच शाळेला रामराम

मनरेगाच्या रोजगारांत २०२५-२६ मध्ये मोठी घट