Surrogacy racket exposed : हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक

Surrogacy racket exposed

हैद्राबाद : हैद्राबाद पोलिसांनी नामांकित युनिव्हर्सल सृष्टी  फर्टिलटी सेंटरमधील सरोगसी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)च्या नावाखाली जोडप्यांना अर्भके विक्रीच्या आरोपाखाली डॉ. अथलुरी नम्रथा यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. या क्लिनीकने वैध परवान्याशाय एका जोडप्याला त्यांचा डीएनए जुळत नसताना ३५ लाख रुपये देऊन बाळाची विक्री केली आहे. (Surrogacy racket exposed)

रविवारी हैद्राबाद पोलिसांनी आठ जणांना अटक केली. युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरचे डॉ. अथलुरी नम्रथ (वय ६४), सरकारी गांधी रुग्णालयातील भुलतज्ज्ञ डॉ. नारगुला सदानंदम ४१ आणि एजंट आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. सरोगसी प्रक्रियेच्या नावाखाली ग्राहकांना फसवणूक करणे आणि बाळ विक्रीचे रॅकेट चालवणे या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना तपासात असेही आढळून आले आहे की सृष्टी फर्टिलरी सेंटरचा  परवाना २०२१ मध्ये रद्द करण्यात आला होता. तरीही डॉ. नम्रता हे केंद्र बेकायदेशीरपणे चालवत होत्या. त्या कोंडापूर हैद्राबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे आणखी तीन केंद्रे चालवत होत्या. या सर्व केंद्रावर पोलिसांनी छापे टाकले आहेत.

सिकंदराबादमधील एका फर्टिलिटी क्लिनिकशी संबधित या प्रकरणात पोलिसांना तपासात असे आढळून आले आहे की गरीब कुटुंबाकडून विकत घेतलेले बाळ २०२४ मध्ये आयव्हीएल उपचार घेणाऱ्या शहरातील जोडप्याला देण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की क्लिनिकडे या जोडप्याला सरोगसीचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला आणि हे मूल जैविकदृष्ट्या त्यांचेच असेल असे आश्वासन दिले होते. या प्रक्रियेसाठी ३५ लाख रुपये आकारण्यात आले होते. (Surrogacy racket exposed)

गोपालपुरम पोलिसांकडे २६ जुलै रोजी एका जोडप्याने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही ताजी घटना उघडकीस आली. सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ओळखले जाते. त्यांनी एका जोडप्याला सरोगसीद्वारे बाळ दिले. पण ते बाळ जैविकदृष्ट्या नाही. त्यांनी स्वतंत्रपणे डीएनए चाचणी केल्यानंतर ते त्यांचे जैविकबाळ नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रक्रियेसाठी क्लिनिकला ३५ लाख रुपये दिले आहेत. या आरोपावर डीसीपी म्हणाले, “मुख्य आरोपीची चौकशी केल्यानंतर आम्हाला असे आढळून आले की हा सरोगसीचा खटला नाही. डॉ. नम्रता आणि त्यांचे कर्मचारी गरीब गर्भवती महिलांकडून पैशाचे अमिष दाखवून खरेदी केलेल्या निपुत्रिक जोडप्यांना अर्भक विकत होते”. (Surrogacy racket exposed)

ते पुढे म्हणाले, “अटक करण्यात आलेल्या जैविक पालक हे आसामचे आहेत आणि हैद्राबादमध्ये रहात होते. त्यांना ९० हजार रुपये दिले होते. आईला प्रसुतीसाठी विशाखापट्टनमला पाठवण्यात आले. बाळ दोन दिवसाचे होते तेव्हा ते तक्रारदार जोडप्याला जैविक मुलगा आहे असे समजून विकण्यात आले. अटक करण्यात आलेल्यामध्ये डॉ. नम्रथ यांचा मुलगा पी.जयंत कृष्णा वय २५ हा पैशाचा व्यवहार पहात होते. तसेच क्लिनिकडे दोन कर्मचारी सी. कल्याणी अचयम्मा ४०, जी. चेन्ना राव ३७, एजंट धनश्री संतोषी ३८ याचा समावेश आहे. बाळाचे जैविक पालक मोहम्मद अली आदिक ३८, नसरीन बेगम २५ अशी त्यांची ओळख पटली आहे. सात आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत चंचलगुडा तरुंगात पाठवण्यात आले आहे.

तक्रारदारांचा ऑगस्ट २०२४ मध्ये क्लिनिकशी संपर्क

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार मूळ राजस्थानचे असून त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये प्रजनन आणि आयव्हीएफ सल्लामसलतसाठी प्रजनन केंद्राशी संपर्क साधला होता. भेटीदरम्यान, डॉ. नम्रथा यांनी प्रजनन चाचण्या केल्या आणि जोडप्याला सरोगसीचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला. पुढील प्रक्रियांसाठी त्यांना क्लिनिकच्या विशाखापट्टणम शाखेत जाण्यास सांगण्यात आले.

“त्यांना आश्वासन देण्यात आले होते की क्लिनिककडून सरोगेटची व्यवस्था केली जाईल आणि त्यांच्या गर्भाचे प्रत्यारोपण केले जाईल. नऊ महिन्यांच्या कालावधीत, या जोडप्याने सल्लामसलत, उपचार आणि सरोगेट काळजीसाठी अनेकवेळा पैसे दिले,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “या संपूर्ण कालावधीत, क्लिनिकने गर्भधारणा सुरळीत सुरू असल्याचा दावा करत नियमित अपडेट्स दिले.”

जून २०२५ मध्ये, या जोडप्याला माहिती मिळाली की विशाखापट्टणममध्ये सरोगेट आईने सिझेरियनद्वारे मुलाला जन्म दिला. बाळाचा ताबा घेण्यापूर्वी त्यांना अतिरिक्त दोन लाख रुपये प्रसूती शुल्क देण्यास सांगण्यात आले. क्लिनिकने असा दावा केला की मुलाचे जैविक वडील अधिक पैशांची मागणी करत होते.

“विझागला पोहोचल्यानंतर, बाळाला बनावट जन्म प्रमाणपत्रासह, ते मूल जैविकदृष्ट्या त्यांचे असल्याचे खोटे दर्शविणारी कागदपत्रे देण्यात आली,” असे पोलिसांनी सांगितले.तक्रारदारांनी डॉ. नम्रथा यांना डीएनए अहवाल मागितला तेव्हा त्यांना आढळले की बाळाची नोंदणी करण्यापूर्वी ते केले गेले नव्हते. तथापि, क्लिनिकचे प्रतिनिधी त्या जोडप्याला खोटे आश्वासन देत राहिले की ते मूल त्यांचे आहे.

दिल्लीतील वसंत कुंज येथील फॉरेन्सिक्स लॅबमध्ये या जोडप्याने तिघांचीही डीएनए चाचणी करण्याचा पर्याय निवडला तेव्हा संशय निर्माण झाला, ज्यामध्ये असे दिसून आले की दोघांपैकी दोघांचाही मुलाशी कोणताही अनुवांशिक संबंध नव्हता.

“जेव्हा त्यांनी क्लिनिककडून स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉ. नम्रथाने सुरुवातीला त्यांचे नंबर ब्लॉक केले आणि नंतर त्यांना धमकावले आणि पुढील कागदपत्रे देण्यास नकार दिला,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

 क्लिनिकच्या वागण्याला कंटाळलेल्या या जोडप्याने सुमारे एक आठवड्यापूर्वी गोपालपुरम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ” डॉ. नम्रथाने तक्रारदार जोडप्याला तिच्या जैविक आईला भेटू दिले नाही, जिला ते सरोगेट माता मानत होते,” असे डीसीपी म्हणाले.

Related posts

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी