बीड जिल्ह्यात पीकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा

Suresh Dhas

नागपूर  : जमीर काझी

पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शनिवारी केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद राज्यभरात उमटत असताना याच प्रकरणात अडचणीत सापडलेले मुंडे यांच्यावर धस यांनी आरोप केल्याने सरकारसाठी हा घरचा आहेर समजला जात आहे. (Suresh Dhas)

हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावेळी धस यांनी बीड जिल्ह्यात बोगस नावाने पीक विमा योजना काढण्यात आल्याचे पुराव्यानिशी सादर केले. बीडप्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्यांतही अशाच प्रकारे हजारो कोटींचा घोटाळा झाला असेल, त्याचा कसून तपास करावा अशी मागणीही धस यांनी केली.

त्यांच्या या आरोपामुळे सरकार बॅकफूटवर गेले. आमदार धस यांनी मुंडे यांचे नाव न घेता पीक विमा योजनेतील घोटाळा हा २०२३-२४ या कालावधीत झाला आहे. सुमारे सात हजार हेक्टरचा घोटाळा एकट्या बीड जिल्ह्यात सापडला. धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टरचा घोटाळा आहे. सोनपेठ तालु्क्यात १३ हजार १९० एकर विमा भरला गेला आहे. विमा भरणारे सीएससी सेंटरही परळी तालुक्यातीलच आहेत, याकडे धस यांनी लक्ष वेधले. (Suresh Dhas)

मी परळी तालुक्यातल्या सगळ्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना दोष देत नाही. मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. २०२३ मध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून ते उघडकीस आणावे आणि दोषींना शिक्षा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मंत्र्याचे नाव जाहीर करा : दादा भुसे

आमदार सुरेश धस हे तत्कालीन कृषिमंत्री यांच्या आशीर्वादाने पीक विमा कर्ज घोटाळा झाल्या असल्याचे सभागृहात सांगत होते. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री यांनी उभे रहात मीही कृषी खाते सांभाळले आहे. त्यामुळे आपण कोणत्या कालावधीत घोटाळा झाला आहे. कोणत्या मंत्र्यांनी केला आहे. ते नाव घेऊन सांगावे असे सांगितले, त्यावर धस यांनी हा घोटाळा २०२३-२४ या कालावधीत झाला आहे, असे सांगत भुसे यांना अप्रत्यक्षपणे क्लीन चीट दिली. (Suresh Dhas)

घोटाळा खणून काढणार : मुख्यमंत्री

अंतिम आठवडा स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा उल्लेख केला. पीक विमा योजनातील घोटाळा हा गंभीर विषय असून त्याचा आम्ही मुळापासून छडा लावू, कोणाही दोषींना सोडणार नाही, असे आश्वासन दिले.

हेही वाचा :

Related posts

Gold price  : ‘सोनि’याचा वेलू गेला ‘लाखा’वरी

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत