राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

Supriya Sule's views on the merger of the NCP

नवी दिल्ली : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. एनडीए सोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Supriya Sule’s views on the merger of the NCP)

आम्ही आमच्या मार्गाने जातोय, ते त्यांच्या मार्गाने

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर त्या म्हणाल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी अजितदादांची मनापासून इच्छा होती. जयंतराव, मी, अजितदादा आणि अजुन काही नेते यांना या विषयाची माहिती आहे. पण आता उणीदुणी काढण्यात अर्थ नाही. मी इतिहासात रमत नाही. आम्ही अनेकवेळा भेटलो होतो. पुढे काय करणार हे आमचं ठरलं होतं. आता दादा नाही. मला तो विषय काढायचा नाही. आम्ही आमच्या मार्गानी ते त्यांच्या मार्गानी जातायेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule’s views on the merger of the NCP)

भाजपसोबत जाण्याचा विषयच नाही

पत्रकारांशी बोलताना त्यांना भाजपप्रणीत एनडीएसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी जाणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याशी कोणी बोलत नाही. आम्ही कुणाशी बोलत नाही. भाजपसोबत जाण्याचा विषयच आमच्या चर्चेत नाही. मोदी सरकार आल्यापासून गेली बारा वर्षे माध्यमं माझ्या शपथविधीविषयी बातम्या करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीतील कोणताही खासदार अस्वस्थ नसल्याचे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी उत्तर दिले. राष्ट्रवादीचे सर्व खासदार नियमित संपर्कात आहेत. एकमेकांना भेटतो, विविध विषयावर चर्चा करता असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धवजी,अजितदादा भेटीवर मी वेगळा अर्थ काढला नाही

खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या. शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात गेले ही घटना सर्वांना माहित आहे. या भेटीमागची पार्श्वभूमी काय होती हे मी काल राऊत यांना सांगितले आहे. कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील असेही सुळे म्हणाल्या. ज्यावेळी अजितदादा एनडीएमध्ये गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने १७ व्या दिवशी दादांना भेटून आली होती. हे वास्तव् आहे. मी त्याचा अर्थ काढला की उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे उद्धवजी फक्त दादांना शुभेच्छा द्यायला गेले असावेत. मी त्याचा वेगळा काही अर्थ काढला नाही हे आम्ही समजून घेतले. दादांनी घेतलेला निर्णय आम्हाला अयोग्य वाटला होता. तरीही सशक्त लोकशाहीत संवाद असलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule’s views on the merger of the NCP)

Related posts

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना