जगाची स्थिती ‘बनाना रिपब्लिकन’ सारखी होईल : सुप्रिया सुळे

The state of the world will become like that of a ‘Banana Republic

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंधनाचे दर वाढवणार नाही असे सरकार सांगत आहे, पण पंधरा दिवसांनंतर त्याचीही दरवाढ होणार आहे. त्यामुळे सरकारने सर्व स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. हे असेच सुरू राहिले तर जगाची स्थिती ‘बनाना रिपब्लिक’ सारखी होईल. त्यामुळे सरकारने सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे; त्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

आम्ही देशहितासाठी सरकारसोबत उभे राहू

लोकसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेत त्यांनी सरकार प्रश्न विचारले.  सुप्रिया सुळे म्हणाल्या,  देशात गॅस सिलिंडरच्या संदर्भात लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून युद्धाच्या परिस्थितीमुळे तो मिळेल की नाही याबाबत लोक साशंक आहे. अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहे. संसदभवन परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनीही निदर्शने केली. याचा उल्लेख करुन एक कॅबिनेट मंत्री म्हणाले की, देशाने आता एकत्र येण्याची गरज आहे. याकडे लक्ष वेधत सुप्रिया सुळे यांनी  ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला होता, त्यावेळी सर्व विरोधक देशासाठी सरकारसोबत खंबीरपणे उभे होते. आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करून भारताची भूमिका जगासमोर मांडली होती. आज पुन्हा तशीच वेळ आली असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावावी. आम्ही देशहितासाठी सरकारसोबत उभे राहू, अशी ठाम भूमिका मांडली.  (The state of the world will become like that of a ‘Banana Republic)

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील अन्नछत्राचा उल्लेख

सुप्रिया सुळेंनी गॅस टंचाईचा मुद्दा मांडताना त्या म्हणाल्या. ​कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दररोज पाच हजार लोकांसाठी प्रसाद तयार केला जात असे, पण आज केवळ दोन हजार लोकांसाठीच तो तयार केला जाऊ शकतो. सगळीकडे हेच चित्र आहे. जळगावमध्ये उत्तम दागिने मिळतात, पण आता गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे तिथले काम बंद झाले आहे. माझ्या पुणे जिल्ह्यातील आज ७५ टक्के कंपन्या बंद आहेत. अनेक शहरांतील हॉटेल्स बंद आहेत; हे सर्व गॅसच्या तुटवड्यामुळे होत असल्याचे सांगितले. यावर सरकारने एक निवेदन देणे गरजेचे आहे, आम्ही सरकारसोबत आहोत, असे सांगितले. (The state of the world will become like that of a ‘Banana Republic)

महिलेला स्वस्त दरात एलपीजी देण्याचा संकल्पाची काय स्थिती आहे?

मोदीजी ज्यावेळी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी प्रत्येक महिलेला स्वस्त दरात एलपीजी देण्याचा संकल्प केला होता. पण आज काय स्थिती आहे? सत्ताधारी खासदार भारतासाठी विशेष काहीतरी घडत असल्याचे सांगत आहेत, पण प्रत्यक्षात तसे काही दिसत नसल्याचे नमूद केले. आज लोक तणावात आहेत. सिलेंडरची किंमत वाढवली आहे आणि त्याचा प्रतीक्षा कालावधीही वाढला आहे. आज लोकांना सिलेंडर मिळेल की नाही, अशी भीती वाटत आहे. अशा वेळी नागरिकांना दिलासा देणे आपली जबाबदारी आहे, पण त्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. (The state of the world will become like that of a ‘Banana Republic)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक  ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी एका ट्रेडच्या चौकशीचा उल्लेख केला आहे. अर्थमंत्र्यांनी या नव्या ‘एस ३०१’ नियमाबद्दल सभागृहाला माहिती द्यावी, तसेच, त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याबद्दलही स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सुळे यांनी केली.

हरित अमोनियाबाबत काहीच केले नाही

सरकार युरियाच्या अनुदानाबद्दल बोलत आहे, पण आपण जो अमोनिया आयात करतो, ती आयात बंद झाली आहे. याच सरकारने सांगितले होते की, या अमोनियाची जागा ‘हरित अमोनिया’ घेईल. पण त्यावर सरकारने वर्षभरात काहीच केले नाही. मग हे सरकार कशाची वाट पाहत आहे? जर फक्त घोषणा होणार असतील आणि त्यावर काम होणार नसेल, तर त्या योजनेला अर्थ राहत नाही, असे ठामपणे सांगितले. ‘नॅनो खता’ची आज काय स्थिती आहे, असा प्रश्न उपस्थित करून सरकारचा तो प्रयत्न यशस्वी झाला की अपयशी, याची माहिती द्यावी अशी मागणी केली. (The state of the world will become like that of a ‘Banana Republic)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर