Sugarcane crushing season : राज्यात एक नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम

Sugarcane crushing season

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील उसाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. तब्बल एक महिन्याने उस हंगाम सुरू होणार असला तरी दिवाळीला साखर कारखान्याची धुरांडी पेटण्याची शक्यता आहे. (Sugarcane crushing season)

महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारने कर्नाटकातील कारखान्याबरोबर सीमेलगतच्या कारखान्याचा हंगाम सुरू करण्याचा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमेवरील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने एक नोव्हेंबरपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. या हंगामात एकूण एक हजार २५०लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारे प्रतिटन पाच रुपयांवरुन १५ रुपये करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. (Sugarcane crushing season)

यावर्षी एक नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. या नवीन पीक हंगामात निर्यातीला परवानगी देण्यासाठी पुरेसा अतिरिक्त साखरेचा साठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. भारतातील साखर निर्यातीमुळे जागतिक किमतींवर दबाव येऊ शकतो, परंतु यामुळे भारत सरकारला देशांतर्गत साखरेच्या किमतींना आधार मिळण्यास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळण्यास मदत होईल. (Sugarcane crushing season)

भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०२५-२६  या मार्केटिंग वर्षात उत्पादन ३४.९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर २८.५ ते २९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो या वर्षी २८ दशलक्ष मेट्रिक टन होता. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. आपली देशाची गरज भागवून देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात परदेशात करतो. दरम्यान, मागली वर्षी काही राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र घटलं होतं. त्यामुळं ऊसाचा गळीत हंगाम देखील कमी दिवसाचा झाला होता. परिणामी उत्पादन देखील काही प्रमाणात कमी झालं होतं. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी साखेरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sugarcane crushing season)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर