One killed in slab collapse : फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, पाच जखमी

One killed in slab collapse

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीसाठी टाकण्यात येत असलेला नवा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एक बांधकाम कामगार ठार झाला तर पाच जण जखमी झाले. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय ३५, रा. नवशा मारुतीजवळ राजारामपुरी, कोल्हापूर) असे मयताचे नाव आहे. (One killed in slab collapse)

फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सोमवारपासून सुरू होते. मंगळवारी सकाळी स्लॅब टाकण्यास सुरुवात झाले. रात्री पावनेनऊ वाजता स्लॅब टाकण्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असताना साहित्य वाहून नेणाऱ्या लिफ्टचा धक्का स्लॅबला बसल्याने स्लॅब पत्त्यासारखा कोसळला. स्लॅबवर चौघे तर स्लॅबच्या खालीचे दोन कामगार होते. स्लॅब कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्लॅबवरील चौघांनी उड्या मारल्या. त्यापैकी दोघे स्लॅबसह कोसळले. स्लॅबखाली चौघे दबले गेले. स्लॅब कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजारी असलेल्या नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  फायर स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांनी बचावकार्य करुन जखमींना बाहेर काढले आहे सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. रस्त्यांवरुन येणाऱ्या जाणाऱ्यांनी वाहने थांबवून बचाव कार्यात भाग घेतला. (One killed in slab collapse)

घटनास्थळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका प्रशासक के.मंजुलक्षी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर उप अधीक्षक प्रिया पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी भेट दिली. (One killed in slab collapse)

जखमींवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार

स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात अक्षय पिराजी लाड (वय ३०, रा. शिवशक्ती कॉलनी, गंगाई लॉन, फुलेवाडी) , दत्तात्रय सुभाष शेंबडे (३७, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), वैभव राजू चौगुले (२५, रा. बेलबाग, मंगळवार पेठ), जया सुभाष शेंबडे (३७), सुमन सदा वाघमारे (६०) हे कामगार जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (One killed in slab collapse)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर