SIT against BJP Minister: भाजप मंत्र्याविरोधात ‘एसआयटी’

SIT against BJP Minister

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्यावर ‘दहशतवाद्यांची बहीण’ या भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२८ ऑगस्ट)  दिले. त्याचवेळी त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याची मागणी करणारी काँग्रेस नेत्या डॉ. जया ठाकूर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. (SIT against BJP Minister)

न्यायालयाने ठाकूर यांनी त्यांच्या याचिकेत अधोरेखित केलेल्या घटनांची चौकशी करण्याचे आणि त्यासंदर्भात व्यापक अहवाल सादर करण्याचे आदेश तपास पथकाला दिले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. याचिकाकर्त्याची बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकिलांना, ‘‘आमच्यासमोर अशा प्रकारची याचिका दाखल करू नका,’’ अशी सूचना केली.(SIT against BJP Minister)

उत्तरात, वरिष्ठ वकिलांनी स्पष्ट केले की संबंधित प्रकरणे न्यायालयात आधीच प्रलंबित असल्याने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, त्यांनी योग्य मंचाकडे जाण्याची मुभा देऊन माघार घेण्याची परवानगी मागितली.

त्यानुसार, खंडपीठाने खटला निकाली काढला. ‘‘ यावर उपाय काय आहे आणि कुठे जायचे हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे,’’ असे न्यायमूर्ती कांत यांनी वरिष्ठ वकील ठाकूर यांना सांगितले.(SIT against BJP Minister)

काही असो, खंडपीठाने एसआयटीला शाह यांच्याशी संबंधित काही भूतकाळातील घटनांची तपासणी करण्यास सांगितले. याचा याचिकेतही उल्लेख करण्यात आला आहे.

‘‘ही याचिका आम्ही स्वीकारत नाही, परंतु याचिकेत या गृहस्थाच्या काही भूतकाळातील घटनांबद्दल जे उघड केले आहे, त्या घटनांची देखील एसआयटीने तपासणी करावी आणि तुमचा अहवाल त्यांवर देखील व्यापक असावा अशी आमची इच्छा आहे,’’ असे स्पष्ट करत न्यायमूर्ती कांत यांनी याचिका निकाली काढली.(SIT against BJP Minister)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणांविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईबद्दल पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली होती. त्यावेळी शाह यांनी एका कार्यक्रमात “जिन्होने हमारी बेटीयों के सिंदूर उजाडे… हमने उन्हीकी बहेन भेज कर के उनकी ऐसी की तैसी करवाई,’’ असे वक्तव्य करत वाद निर्माण केला होता.

वादग्रस्त वक्तव्य करणारा जबाबदार लोकप्रतिनिधी आणि मंत्र्याची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी डॉ. ठाकूर यांनी केली होती.

हेही वाचा :
हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक
देशाचा उल्लेख भारत असाच हवा : भागवत

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर