मुंबई : अभिनेता संजय दत्तला त्याच्या चाहत्या महिलेने ७२ कोटीची मालमत्ता दिली होती. या ६२ वर्षीय महिलेने तिची संपूर्ण मालमत्ता मला दिली होती, अशी कबुली त्याने नुकतीच एका कार्यक्रमात दिली. पण या मालमत्तेचे त्याने काय केले याचा खुलासाही संजय दत्तने केला. (Sanjay Dutt)
चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा वेगवगेळे प्रयत्न करतात. अलीकडेच, संजय दत्तच्या एका महिला चाहतीने तिची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता त्याला सोडल्याची जुनी कहाणी व्हायरल झाली. ही घटना २०१८ची आहे. या महिलेने आपल्या निधनानंतर आपली सुमारे ७२ कोटींची मालमत्ता संजय दत्तला दान दिल्याचे जाहीर केले होते. अनेकांना ती बातमी खोटी बातमी वाटली होती, तथापि, संजयने अलीकडेच एका संवादात या घटनेला दुजोरा दिला. तथापि, त्याने मिळालेल्या या मालमत्तेचे काय केले हे सांगितल्यानंतर त्याच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला. त्याने जे केले ते खरोखरच मनापासून केले. त्यातून त्याचे खरे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते.
‘कर्ली टेल्स’शी झालेल्या संवादात संजयला याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. एका महिला चाहत्याने त्याच्यासाठी ७२ कोटी रुपयांची मालमत्ता सोडली आहे हे खरे आहे का? असे विचारले असता त्याने ते खरे असल्याचे मान्य केले. त्याने या मालमत्तेचे काय केले असे विचारले असता, त्याने “मी ती कुटुंबाला परत दिली,” असे स्पष्ट केले. (Sanjay Dutt)
निशा पाटील असे या महिलेचे नाव. २०१८ मध्ये तिने तिची ७२ कोटी रुपयांची संपूर्ण मालमत्ता अभिनेत्याला देऊन टाकली होती. निशा मुंबईत राहत होत्या. त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले होते. मृत्यूपूर्वी त्यांनी ही सर्व मालमत्ता संजय दत्तकडे सोपविण्याची सूचना तिच्या बँकेला केली होती. (Sanjay Dutt)
संजय दत्तने १९८१ मध्ये रॉकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या काही वर्षांत, त्याने विधाता, नाम, साजन, खल नायक, वास्तव, मुन्ना भाई एम.बी.बी.एस. असे एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत.
हेही वाचा :
हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक
देशाचा उल्लेख भारत असाच हवा : भागवत