टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी

Shivaji University Soars in Times Asia Rankings

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन  एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण व गुणवत्ता, आंतरराष्ट्रीयकरण, उद्योग- शिक्षण, सहकार्य या पंचसुत्रीवर आधारित असते. भारतातील एकूण सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत दहावे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक राज्य विद्यापीठांत दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या सार्वजनिक राज्य विद्यापीठांचाच समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठाने या मुल्यांकनामध्ये प्रथमच सहभाग नोंदवून या प्रतिष्ठित मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाला ३६ देशांतर्गत आशिया स्तरावरती  ४०१–५०० या मानांकन बँडमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. या एशिया स्तरावरील पहिल्या ५०० मानांकनप्राप्त विद्यापीठांमध्ये भारतातील जवळपास ६६ भारतीय संस्था असून यामध्ये १९ भारतीय सर्वोच्च संशोधन संस्था, नऊ केंद्रीय विद्यापीठे,  १० सार्वजनिक राज्य  विद्यापीठे व २८ खाजगी,स्वायत्त विद्यापीठांचा समावेश आहे. या मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास भारतीय स्तरावर एकूण विद्यापीठांअंतर्गत १३ वी मानांकन बँड आणि सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत पाचवी मानांकन बँड प्राप्त झाली आहे. (Shivaji University Soars in Times Asia Rankings)

पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे मानांकन विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीची साक्ष देणारी असून यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली आहे. हे यश विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संविधानिक अधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांचे सातत्यपूर्ण संशोधन व अध्यापन, विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि इतर सर्व संबंधित घटकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे (Shivaji University Soars in Times Asia Rankings)

या संदर्भात कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठातील सर्व घटकांचे अभिनंदन केले. भारतातील इतर सार्वजनिक राज्य विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख कार्य या सर्व बाबींमध्ये आघाडीवर असल्याचे या मानांकनामधून स्पष्ट झाले आहे. ही कामगिरी विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी शिक्षक, अधिकारी-कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, विद्यापीठ क्षेत्राशी सर्व निगडीत घटक यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यात विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणखी उच्च स्थान मिळवण्यासाठी हीच प्रेरणा ठरणार आहे, असे गौरवोद्गार काढले. (Shivaji University Soars in Times Asia Rankings)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ