बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेज अव्वल

Vivekanand College Tops Class 12 Exams

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल ९९.२७ टक्के लागला.  यामध्ये विज्ञान शाखेत प्रथमेश परमेश्वर काकडे ९४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन करुन अव्वलस्थानी राहिला. श्रध्दा गणपत सुतार ९२.१७ टक्के गुण संपादन करीत दुसरी आली.  संचिता नरेंद्र कुलकर्णी ९२.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

            वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेचा ९२.७४ टक्के निकाल लागला. यामध्ये आर्या वरद दीक्षित व अनिष आनंदा संकपाळ यांनी  ९५.६७ टक्के गुण पहिला क्रमांक पटकावला.  मनुश्री प्रसन्न शहा ९५.३३ टक्के गुण संपादन करुन दुसरी आली तर स्वालीया चौधरी यांनी ९३.३३ टक्के गुण मिळवून तिसरी आली. (Vivekanand College Tops Class 12 Exams)

वाणिज्य (मराठी माध्यम) मध्ये देसाई सना अल्लाउद्दीन देसाईने ८८.६७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. साक्षी बाबासो तोरस्कर व रणवीर राजाराम अनपट यांनी ८६.०० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर स्नेहल गौतम माने हिने ८४.६७ % गुण मिळवून तिसरा  क्रमांक मिळविला.

            कला शाखेचा ८७.६७ टक्के निकाल लागला. त्यामध्ये आभा भूषण कपाले ८७.६७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला, यशोधन नंदकिशोर अनुसे ८७.३३ टक्के गुण मिळवित दुसरा आला.  संस्कृती राजेंद्र रानगे  ८४.८३ टक्के गुण संपादन करुन विवेकानंद कॉलेजमध्ये तिसरी येण्याचा बहुमान संपादन केला. १०० पैकी १०० गुण संपादन करणारे अकौटन्सी विषयामध्ये तीन विद्यार्थी , कॉमर्स  मॅथ्स् मध्ये दोन विद्यार्थी, सायन्स  मॅथ्स् मध्ये दोन विद्यार्थी तर जिऑलॉजी विषयात नऊ विद्यार्थी आहेत. (Vivekanand College Tops Class 12 Exams)

           श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची विद्यासमिती आणि विवेकानंद कॉलेजने राबविलेल्या विशेष स्कॉलर बॅचच्या प्रयत्नामुळे यावर्षीही विवेकानंद कॉलेजने सर्वात अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली असून विज्ञान, वाणिज्य  आणि कला शाखेतील आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.  प्रा. एस.एन.साळुंखे, प्रा.एस.एल.पाटील, प्रा.वर्षा महाडीक, प्रा. भाग्यश्री पाटील,  कला विभाग स्कॉलर बॅच प्रमुख प्रा विश्वंभर कुलकर्णी , प्रा. सुभाष रानमाळे यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कला वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शिल्पा भोसले, विज्ञान विभागप्रमुख प्रा एम आर नवले  यांनी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले. (Vivekanand College Tops Class 12 Exams)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ