मुंबई : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीतील पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ शेअर होताच विधानभवनासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करणार का? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे. (Shirsat bag video)
या व्हिडिओमध्ये मंत्री शिरसाट एका खोलीतील बेडवर बसले असून ते मोबाईलवर बोलत आहेत. त्याच्या हातात सिगारेटही आहे. बोलत असताना ते सिगारेटही ओढत आहेत. व्हिडिओमध्ये बेडशेजारी एक बॅग दिसत असून त्यामध्ये नोटांची बंडलं आहेत. तसेच शिरसाट यांचा पाळीव श्वानदेखील दिसत आहे. (Shirsat bag video)
शिरसाट हे एका हॉटेलमध्ये पैशाच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, आयकर विभागाच्या नोटीस आल्यानंतर माझ्याकडे हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ पाहून फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. (Shirsat bag video)
या व्हिडिओवर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तो व्हिडिओ माझ्या बेडरुममधील आहे. मी प्रवास करुन आल्यानंतर बेडवर बसल्याचे दिसत आहे. बेडशेजारी आमचा श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची अडकवलेली बॅग दिसतेय. त्याची बातमी होते याच मला आश्चर्य वाटतयं.
त्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, माझ्याकडे मातोश्री व मातोश्री २ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडे असते. कार्यकर्ते येतात. उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला आहे. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावले जात नाही. काम काय आहे. नाव काय अशा गोष्टी विचारल्या जात नाहीत असा टोलाही त्यांनी मारला. (Shirsat bag video)
राऊत यांनी हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत देशात काय चालले आहे असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांची दया येते. स्वत:च्या अब्रुचे किती धिंडवडे ते फक्त पहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, अशी टीकाही केली आहे. (Shirsat bag video)