कोल्हापूर : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातील ५० हजार कोटीच्या ढपल्या मध्ये आपणालाही काही मिळेल काय या अशानेच काही लोक शक्तीपीठाचे समर्थन करत आहेत, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला. शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्यावतीने करवीर निवासनी अंबाबाईला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले. (Shetty criticize Shirsagar)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील पांडुरंगाला साकडे घातल्यानंतर आता करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले.एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत आज शुक्रवारी बैठक होत आहे. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले. यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. अशी मागणी केली. (Shetty criticize Shirsagar)
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून याला विरोध नाही, असे भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. ५० हजार कोटीचा यामध्ये ढपला पाडला जाणार आहे. यामध्ये आपणाला काही मिळेल काय या आशेनेच काही लोक याच समर्थन करत आहेत. असा टोलाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी, आमदार क्षीरसागर यांच नाव न घेता लगावला. जे आमदार मुंबईमध्ये शक्ती पिठाच्या समर्थनार्थ बैठक घेणार आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या जनतेन त्यांना मत देऊन निवडून दिले आहे. हे विसरू नये, असा इशारा दिला. (Shetty criticize Shirsagar)
आंदोलनात शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि इंगवले, माजी महापौर आर के पोवार, राजू लाटकर, सचिन चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, अनिल घाटगे, प्रकाश पाटील, तौफीक मुल्लाणी, अजित पोवार, बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, आनंदा बनकर, दता वारके, सागर कोंडेकर, सुयोग वाडकर, युवराज गवळी, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रवीण केसरकर, राजाराम गायकवाड, ईश्वर परमार, विनायक फाळके, सचिन पाटील, जय पटकारे, रियाज सुभेदार, फिरोज सौदागर, दिग्वीजय मगदूम, भैया शेटके, किशोर खानविलकर, संपत चव्हाण, शशिकांत बिडकर, संजय पटकारे, विनायक घोरपडे, अक्षय शेळके, उमेश पाडळकर, वैशाली पाडेकर, आदिसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shetty criticize Shirsagar)