Shinde’s Delhi tour : उपमुख्यमंत्र्याची दिल्ली वारी विरोधकांच्या टारगेटवर

Shinde’s Delhi tour

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीच्या दिल्ली दौरा केल्यानंतर ते विरोधकांच्या रडारवर आले आहेत. पावसाळी अधिवेशन सोडून शिंदे दिल्लीला का गेले याबाबत सत्ताधारी महायुतीतही तर्कवितर्काला उधान आले आहे. (Shinde’s Delhi tour)

उप मुख्यमंत्री शिंदे अचानक  बुधवारी दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या चर्चेचा तपशील कळाली नसली तरी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची कोंडी होत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आगामी महानगरपालिका निवडणूकीत कोणती रणनिती आखायची याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  हिंदी सक्तीचा विषय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पुढे करुन नंतर माघार घेतल्याने शिंदे शिवसेना बॅकफूट आल्याने शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी जा प्रकल्पांना मान्यता दिली होती त्यांना स्थगिती मिळत आहे. तसेच शिंदे यांच्या मंत्र्याच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाकडून मागणी आल्यानंतर त्याची चौकशी लावली जात असल्याने शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी आहे. शिंदेना डावलून फडणवीस आणि पवारांची जवळीक वाढत आहे. शिंदेंच्या मंत्र्याच्या खात्यातील निधी वळवला जात आहे तर लोकप्रतिनिधीकडून निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. मंत्री संजय बनसोडे यांना आयकर खात्याची नोटीस आली आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकरची नोटीस आल्याच् चर्चा आहे. या सर्व तक्रारीवर वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. (Shinde’s Delhi tour)

शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या प्रकल्पाच्या मान्यतेसंदर्भात दिल्लीतील नेत्यांशी शिंदे यांनी चर्चा केली असावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट केली आहेत. त्यात असे म्हटले आहे की “ गुरुपोर्णिमेनिमित्त उप मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरू अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपोर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहे असे दाखवले. पण दिल्लीत गुरू अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठ एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली. तुर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!. राऊत आगामी काळात शहा शिंदे भेटीबाबत काय गौप्यस्फोट करतात याकडे लक्ष लागले आहे. (Shinde’s Delhi tour)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर