Shinde group Dasara Melava : दिवाळीपूर्वीच पुरग्रस्तांना मदत देण्याचा एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

Shinde group Dasara Melava

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को मैदान सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तुम्हाला त्या आधी मदत पोहोचवणार असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला. मेळाव्याच्या ठिकाणाहून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १५ ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. ( Shinde group Dasara Melava)

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बळीराजा संकटात आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांची जमीन वाहून गेलीय, पशुधन वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मंत्र पळणार आहोत. जिथे संकट, जिथे आपत्ती तिथे शिवसेना,” असे म्हणत एकनाथ शिंदेंनी यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. (Shinde group Dasara Melava)

एकनाथ शिंदे म्हणाले,  “आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचे काम इथून घेऊन जाण्याचे काम आपण केले आहे. माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनींना माझी विनंती आहे की, तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत, टोकाचे पाऊल उचलू नका. तुमचे जीवन जे उध्वस्त झालेले आहे, त्याला उभारी देण्याचे काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहिती आहे.”

उद्धव ठाकरेंवर टीका

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,  “संकट काळात शिवसैनिक घरी नाही बसला, तर मदत घेऊन शेतकऱ्याच्या दारी गेला. आम्ही घरी नाही बसत, आम्ही लोकांच्या दारात जातो. आम्ही शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो, माझ्या शिवसैनिकांनी मराठवाड्यातील नागरिकांच्या घरात जाऊन त्यांची घर साफ करत आहेत. दरवाजाला तोरण लावत आहेत. रांगोळी काढत आहेत. अशा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच, “मी वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा शिवसैनिक नाही. मी ग्राउंडवर उतरून काम करणारा शिवसैनिक आहे. आम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवले आहे.” असे म्हणत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ( Shinde group Dasara Melava)

शिवसेनेच्या मदतीवरील फोटोवरुन उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात. त्या फोटोच्या आतील साहित्य दिसत नाही. आम्ही २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या. तुम्ही एक बिस्कीटचा पुडा तरी घेऊन गेलात का. तेवढा तरी घेऊन जायचा होता. तेवढी तरी दानत दाखवायची होती. अशा शब्दात टीका केली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर