Dasara Melava : हिंदूत्वाचे सोंग, देशभक्तीचे ढोंग करु नका ; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Dasara Melava

मुंबई : प्रतिनिधी :  हिंदुत्वाववरुन आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा तुमच्या टोप्या उडवल्या शिवाय राहाणार नाही. हिंदूत्वाचे सोंग आणि देशभक्तीचे ढोंग आता करु नका. महाराष्ट्रात गोमाता आणि तिकडे जाऊन खाता, असे तुमचे हिंदुत्व आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचा चिखल करु नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाला दिला आहे. (Dasara Melava)

शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला. भर पावसातही शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केले. पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांना मोदी सरकारने देशद्रोही ठरवून अटक करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचूक हे लेह, लडाख आणि तिथल्या निसर्गासाठी लढत आहे. सोनम वांगचूक यांनी लडाखमध्ये गारठवणाऱ्या थंडीत उभे राहाणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या छावण्या बांधून दिल्या. ते आता न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यासोब लेह लडाखमधील जेन झी देखील रस्त्यावर उतरली. आता मोदींनी त्यांना एक वर्षासाठी रासूका कायद्याखाली तुरुंगात टाकले आहे. जोपर्यंत सोनम वांगचूक हे मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. आता ते पाकिस्तानात जाऊने आले होते असे सांगून त्यांना अटक केली आहे.
पाकिस्तानात जाऊन आले म्हणून त्यांना देशद्रोही म्हटले जात असेल तर नवाज शरीफचा केके गुपचूप खाणाऱ्यांना काय म्हटले पाहिजे, असा सवाल ठाकरेंनी केला. (Dasara Melava)

पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर ठाकरे यांनी टीका केली.  सरकार चालवण्याचा आणि भाजपचा दुरान्वयानेही संबंध नाही. तीन वर्षे झाले मणिपूर जळत आहे. तीन वर्षानंतर नुकतेच नरेंद्र मोदी तिथे जाऊन आले. तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की मणिपूरच्या नावातच ‘मणी’ आहे. हे तुम्हाला तिथे जाऊन सांगायची काय गरज होती. त्यांच्या डोळ्यातील पाणी तुम्हाला दिसले नाही. ते जर तुम्हाला दिसत नसले तर मग कशाला तिकडे जाता, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. (Dasara Melava)

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या

आपले राज्य असताना देवेंद्र फडणवीस आलो दुष्काळ जाहीर करा म्हणून फिरत होते. आता म्हणतात ओला दुष्काळ ही संज्ञा नाही. पण, जनता संकटात असताना तुमची संज्ञा खड्डात घाला आणि मदत करा. तुमचे सर्व निकष बाजूला ठेवून हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत केलीच पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “भाजपने २०१७ साली घोषित केलेली कर्जमाफी अजून केलेली नाही. पण, आपण कर्जमाफी केली. दरम्यान कोरोनाचे संकट आले, एक गोष्ट राहिली ती म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रूपये द्यायला सुरूवात केली होती. गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि ती गोष्ट अर्धवट राहिली,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर केली. (Dasara Melava)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर