Shelar criticizes Raj Thackeray : दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष : मंत्री आशिष शेलार  

Shelar criticizes Raj Thackeray

 जमीर काझी :  मुंबई  : राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, अशी टीका  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केली.

मविआ आणि मनसेच्यावतीने शनिवारी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला त्यांनी प्रदेश कार्यालयात  पत्रकार परिषद घेऊन  प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी आठ वर्गीकरणातील याद्यांमधील मतदारांची नावे सादर केली. ते म्हणाले, ‘अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि मविआ आमदारांचे मताधिक्य याची तुलना करीत अनेक मविआ आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का?असे म्हणत त्यांनी राज ठाकरे, मविआला लक्ष्य केले. भाजपाची भूमिका ही नेहमीच ‘सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही’ अशी आहे असेही त्यांनी नमूद केले. जे कोणी दुबार मतदार दिसतील त्यांना फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही त्यांनी केला. (Shelar criticizes Raj Thackeray)

 महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल  केली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीच्या फेक नरेटिव्हची बांधणी करत रान उठवण्यास सुरुवात केली. त्याचाच पुढचा अंक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे रंगवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा घोटाळा दाबला जात असल्याचे सांगितले. (Shelar criticizes Raj Thackeray)

——–

कर्जत – जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी 31 मतदारसंघांत दुबार मुस्लीम मतदार

३१ विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणानंतर २ लाख २५ हजार ७९१ मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांची संख्या समोर आली असून सर्व २८८मदारसंघातील हाच आकडा १६ लाख ८४ हजार २५६ वर जाऊ शकेल, असा दावा करून शेलार असेही  म्हणाले,’ रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात: मुस्लिम दुबार मतदार ५५३२ (१२४३ मतांनी विजय) :नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघात :मुस्लीमांची दुबार मते ४७७ (२०८ मतांनी विजय), वरुण सरदेसाईंच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात :१३३१३ हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार (११३६५ मतांनी विजय ), बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर ५३२४ मतांनी विजयी झाले , तिथे १४९४४ दुबार मुस्लिम मते आहेत. 

उत्तम जानकरांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते  ४३९९  राजेश टोपेंच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात: दुबार मुस्लिम मते ११७५. (केवळ २३०९ मतांनी शिवसेना विजयी)

अमित देशमुखांच्या लातूर शहर मतदारसंघात : २०,६१३ दुबार मुस्लिम मते

ज्योती गायकवाडांच्या धारावी मध्ये : १०,६८९ दुबार मुस्लिम मते

अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मध्ये : ११,१२६ दुबार मुस्लिम मते

नितीन राऊतांच्या उत्तर नागपूर मध्ये : ८३४२ दुबार मुस्लिम मते

अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिम मध्ये : १७,००७ दुबार मुस्लिम मते (६२२७ मतांनी विजय) .

राहुल पाटील यांच्या परभणी मध्ये : १३,३१३ दुबार मुस्लिम मते

सुनील राऊतांच्या विक्रोळीत : ३४५० दुबार मुस्लिम मते.

संजय पोतनीसांच्या कलिना मध्ये : ६९४७ दुबार मुस्लिम मते (५००८ मतांनी विजय ) 

अनंत नर यांच्या जोगेश्वरी पूर्व मध्ये : ६४४१ दुबार मुस्लिम मते(१५४१ मतांनी विजय )

नितीन देशमुखांच्या बाळापूर मध्ये : ५२५१ दुबार मुस्लिम मते

सुनील प्रभूंच्या दिंडोशीत : ५३४७ दुबार मुस्लिम मते (६१८२मतांनी विजय)

कैलास पाटील यांच्या धाराशिवमध्ये : ११,२४२ दुबार मुस्लिम मते. (Shelar criticizes Raj Thackeray)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला