Ashok Chausalkar : डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी चर्चासत्र

Ashok Chausalkar

कोल्हापूर : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि राज्यघटना’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन रविवार ९ नोव्हेंबर  रोजी करण्यात आलेले आहे.दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे चर्चासत्र होणार आहे.

         या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ.माया पंडित यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ हे बीजभाषण करणार आहेत. यावेळी या चर्चासत्राची भूमिका  डॉ. विजय चोरमारे हे मांडणार आहेत. (Ashok Chausalkar)

 दुसऱ्या सत्रात ‘भारतीय राष्ट्रवादाचा मागोवा’ या विषयावर डॉ.भारती पाटील, प्रमोद ओलेकर हे मांडणी करणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘धर्म, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता’ या विषयावर प्रा.गौतमीपुत्र कांबळे, डॉ.प्रकाश पवार, राधेश्याम जाधव हे मांडणी करणार आहेत.  चौथ्या सत्रात ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे’ या विषयावर अरुण खोरे, प्राचार्य नागोराव कुंभार, शिवाजी पाटील हे मांडणी करणार आहेत. (Ashok Chausalkar)

समारोपाच्या सत्रामध्ये डॉ.अशोक चौसाळकर यांचा माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी वक्ते म्हणून उदय नारकर,जगन्नाथ पाटील यांची भाषणे होणार आहेत. चर्चासत्रामध्ये साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष प्रा. दि.बा.पाटील यांनी केलेले आहे. (Ashok Chausalkar)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर