Sharad Pawar’s demand : भाजप, मुख्यमंत्र्यांनी नव्हे, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे : शरद पवार

Sharad Pawar's demand

नागपूर : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. भाजप, मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देऊ नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी लगावला. (Sharad Pawar’s demand)

शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडल यात्रेस प्रारंभ होणार आहे. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राहूल गांधी यांनी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केल्यानंतर भाजपकडून राहूल गांधीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधीच्या मेंदूतील चीप चोरीला गेली आहे म्हणून टीका केली होती. भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या टीकेबद्दल पवारांना प्रश्न केला असता राहूल गांधी यांचे शरद पवार यांनी समर्थन केले.

शरद पवार म्हणाले राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगासंबधी आक्षेप घेतल्यावर निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर द्यावे. राहूल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपावर भाजप किंवा मुख्यमंत्री आपली मत मांडायला पुढे यायचे कारण मला समजू शकत नाही. आम्हाला जे उत्तर हवे आहे ते निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. भाजपकडून नाही असा टोला पवारांनी हाणला. राहूल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. राहूल गांधीची माहिती चुकीची असेल तर आयोगाने दुरुस्त करावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगावर लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे,  अशी मागणी पवारांनी केली. (Sharad Pawar’s demand)

राहूल गांधी यांच्या आरोपानंतर भाजपने राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहूल गांधीच्या समर्थनात अनेक नेते पुढे आले आहेत. आज पवारांनीही राहूल गांधीचे आरोप बरोबर असल्याचे सांगितले. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकतही विरोधी नेत्यांच्या सूचनेवरुन राहूल गांधींनी मत चोरीचे प्रेझेंटेशन केले होते. राहूल गांधी यांनी संपूर्ण देशात ग्रामीण पातळीपर्यंत जाऊन मतचोरीची माहिती जनतेपुढे पोहोचवावी असे मतही इंडिया आघाडी घटक पक्षांनी केली आहे. (Sharad Pawar’s demand)

Related posts

उच्च न्यायालयाचा  नितीन गडकरींना  दिलासा

सुनेत्रा पवारांसंदर्भातील ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार: अतुल लोंढे

डॉ.डी.वाय.पाटील अनंतात विलीन