‘तृणमल’च्या दोन्ही गटांकडून पक्षांची तीन नावे निवडणूक आयोगाला सादर

Trinamool submits party names to the Election Commission

कोलकोता : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमुल काँग्रेस पक्षाचे मूळ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर तृणमुलच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला नवीन पक्षाच्या नावांसाठी प्रत्येकी तीन नावे दिली आहेत. दोन्ही गटांना कोणते पक्षचिन्ह मिळणार याकडे लक्ष लागले आहे. काल गुरूवारी निवडणूक आयोगाने तृणमुल काँग्रेस पक्षाचे मूळ नाव, पक्षचिन्ह गोठवले होते. आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत दोन्ही गटांनी तीन नावे देण्याचा आदेश दिला होता. (Trinamool submits party names to the Election Commission)

तृणमुल पक्षाच्या संस्थापक माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऑल इंडिया तृणमुल काँग्रेस (ममता बॅनर्जी), तृणमुल काँग्रेस (ममता), तृणमुल काँग्रेस ही नावे सूचवली आहे. बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी गटाने तीन नावे आणि चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. नॅशनलिस्ट तृणमुल काँग्रेस, डेमोक्रेटिक तृणमुल काँग्रेस, वेस्ट बंगाल तृणमुल काँग्रेस ही तीन नावे सादर केली आहे.

निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांत खडाजंगी

पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली असून सहा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि नवीन चिन्ह मिळणे अत्यंत गरजेचे होते. काल १७ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. ममता बॅनर्जीकडून डेरेक ओब्रायम, कल्याण बॅनर्जी, महुआ मोईत्रा आणि सागरिका घोष यांनी आपलाच पक्ष खरा असून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळायला पाहिजे असा दावा केला. तर ऋतब्रत बॅनर्जी गटाकडून चंद्रिमा भट्टाचार्य, अकरुल जमान, अरुप यांनी पक्ष आपल्याला मिळावा यासाठी युक्तीवाद केला. यावेळी दोन्ही गटात खडाजंगीही उडाली. (Trinamool submits party names to the Election Commission)

 संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर टीका

तृणमुल पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग अमित शाह यांचा घरगडी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि पक्षाची धोरणे ठरवले. पक्षाचे जे आमदार, खासदार फुटले ते ममता बॅनर्जी यांचेच होते. अमित शाह यांनी पक्ष फोडला आणि काही लोक बाजुला झाले म्हणून मूळ पक्ष दुसऱ्या गटाचा कसा होऊ शकतो. पक्षाचे संस्थापक अस्तित्वात असतानाही निवडणूक आयोग दबावाखाली असे निर्णय देत असेल तर फक्त दिवे लावून देशातील लोकशाही वाचणार नाही अशी टीका त्यांनी केली. (Trinamool submits party names to the Election Commission)

Related posts

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कितपत संबंध?

निवडणूक आयोगाने विवेकाचा योग्य वापर केला का?; न्यायमूर्तीचा सवाल

अमेरिकेत भारतावर १०० टक्के टॅरिफ लावणारे विधेयक मंजूर