शरद पवारांचा हुकमी एक्का अजितदादाच होते : जयंत पाटील

Sharad Pawar's ace is Ajitdada

जमीर काझी :  मुंबई : महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं जनतेतून आवाज यायचा, एकच वादा अजित दादा. राजकारणात एकसंघपणे काम करावे हे अजितदादाचे स्वप्न होते . हे करत असतानाचा नियतीने घात केला, असे सांगतानाच अजित पवारांचं शरद पवारांवर खूप प्रेम होतं. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का हे अजित पवारच होते, असे भावनिक वक्तव्य माजी मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी केले.  

   दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी देशातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित होते. (Sharad Pawar’s ace is Ajitdada)

अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील म्हणाले की, “कुठून सुरू करू आणि कुठे थांबू अशा अनेक आठवणी अजितदादांसोबत आहेत. १९९१ पासून आमची राजकीय कारकिर्द जवळपास एकत्रच सुरू झाली. त्यानंतर सभागृहातही आम्ही एकत्रच बसायचो. २०१४ पासून तर शेजारी बसण्याचे अनेक प्रसंग आले. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असले तर ठामपणे विरोध करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जाते.

राजकारणात गोड बोलाव लागतं, असं अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही. इतकं रोखठोकपणे अजितदादा बोलायचे. राजकारणात पुन्हा एकसंघपणे काम करायचं, पुन्हा एकदा एकत्र येऊन हळुहळु संघटना मजबूत करायचं धोरण अजित पवारांनी स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा नव्याने काम सुरू करावं असं अजितदादांचं स्वप्न होतं. पण हे सगळं होत असतानाच नियतीने घात केला.” (Sharad Pawar’s ace is Ajitdada)

शरद पवारांचा हुकमी एक्का….

जयंत पाटील म्हणाले की, “आर.आर. आबा गेल्यानंतर मी सतत म्हणायचो, आबा ज्येष्ठ आहेत ते पुढे आहेत, त्यानंतर तुम्ही आणि मग मी असेन. मी करियरच्या बाबत बोलायचो, मात्र हे असं होईल असं वाटलं नव्हतं. दादांनी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली महाराष्ट्राची काळजी देखील घेतली. शरद पवारांवर त्यांच खूप प्रेम होतं. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का अजित पवारच होते.” (Sharad Pawar’s ace is Ajitdada)

अजित पवारांना टापटीपपणा आवडायचा. एखाद्या मतदारसंघातील एखादं काम करायचं असेल तर स्पष्टपणे फोन करून सांगायचे. अजित पवारांना जे करायचं असायचं ते तेच करायचे असे सांगितले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर