Satej Patil’s appeal for help : कोल्हापूरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया

Satej Patil's appeal for help

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने मराठवाड्याचे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेल्याने सर्वोचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जनतेच्या मदतीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया’, असे आवाहन केले आहे. (Satej Patil’s appeal for help)

आमदार सतेज पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे.  कोल्हापूरकरांनो, आपणही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतलाय. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. आज आपली वेळ आहे, ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया! असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. २८ सप्टेंबरपर्यंत मदत जमा करण्याचे आवाहन केले आहे. २९ सप्टेंबरला मदतीचा ट्रक मराठवाड्याकडे रवाना होणार आहे. (Satej Patil’s appeal for help)

नागरिकांनी गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा पावडर, मीठ, मसाले हे किराणा सामाना औषधे, सॅनिटरी पॅडस्, चप्पल, स्लीपर्स, पाण्याच्या बाटल्या, पुरुष, महिला, लहान मुलांसाठी कपडे, बेडशीटस्, चटई, टॉवेल्स, शालेय साहित्य, बिस्किटे, साबण, टुथब्रश, टुथपेस्ट या वस्तू देण्याचे आवाहन केले आहे. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीमध्ये मदत जमा करुन घेतली जाणार आहे.  (Satej Patil’s appeal for help)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक