सातारा एसपी तुषार दोशींना पाठवले सक्तीच्या रजेवर

Satara SP Tushar Doshi sent on compulsory leave

सातारा : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक प्रकरण पोलिस अधीक्षक तुषार दोशींना चांगलेच भोवले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीतील गोंधळाप्रकरणी चौकशी होईपर्यंत एसपी दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्याचा पदभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे देण्यात आला आहे. (Satara SP Tushar Doshi sent on compulsory leave)

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व राडा झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलिस अधीक्षक दोशी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. मंत्री देसाई यांनी विधान परिषदेत या प्रकरणावर आवाज उठवल्यावर उप सभापती निलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदश दिले होते. विधानसभेतही पोलिसांच्या भूमिकेवर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी उप सभापती गोऱ्हे यांनी घेतलेला तुषार दोशी यांच्या निलंबनाचा आदेश रद्द केला. त्यानंतर तुषार दोशी लगेचच कार्यालयात रुजू झाले. आता दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने त्यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Satara SP Tushar Doshi sent on compulsory leave)

तुषार देसाई हे २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, नवी मुंबईमध्ये काम केले आहे. २०१८ मधील एजाज खान अटक प्रकरण आणि अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणातील त्यांच्या हस्तक्षेपावर टीका झाले होती. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमार प्रकरणामुळे राज्यात राजकारण तापले होते. त्यावेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. (Satara SP Tushar Doshi sent on compulsory leave)

Related posts

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी