Sanjay Raut : आरएसएसकडून मोदींना निवृत्तीच्या सूचना : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : प्रतिनिधी : “सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी हे ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, डोक्यावरील केस उडालेले आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सगळी सत्तेची सुख भोगलेली आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदी यांना निवृत्त होण्यासाठी सूचना देत आहे. आणि देश सुरक्षित हातात द्यावा लागेल,” याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळे यांनी घालून दिला होता,’ असे वक्तव्य केले होते.  तसेच अमित शहा यांनी अहमदाबाद येथे ‘राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार आहे,’ असे वक्तव्य केले होते. या दोन्ही वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sanjay Raut)

खासदार राऊत म्हणाले, ७५ वर्षे वय झाल्यावर सत्तेच्या पदावरून निवृत्ती पत्करावी, असा नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वार्थासाठी आणि आपले मार्ग मोकळे करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांवर निवृत्ती लादली.  आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, तर हे देशासाठी शुभ संकेत आहेत, अशी टोलेबाजी राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut)

अमित शहा यांच्या वक्तव्यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले, “हा त्यांचा प्रश्न आहे, पुढे काय करायचे. निवृत्तीनंतर जिवनात चांगल्या गोष्टी करता येतात. अनेकजण सामाजिक कामे करतात. किंबहूना मोदी आणि शहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, देशासाठी शुभ संकेत आहेत.” (Sanjay Raut)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका

चंद्रकांतदादा, मुश्रीफांचे सहकार कायदा बदलण्याचे षढयंत्र ; सतेज पाटील यांचा आरोप