Shambhuraje Desai : कोणाला गद्दार म्हणतो… बाहेर ये तुला दाखवतो…, मंत्र्यांची शिविगाळ

Shambhuraje Desai

मुंबई : प्रतिनिधी : “काय गद्दारी सांगतो, कोणाला गद्दार म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो..  तुझ्या आxxxx गद्दार कोणाला म्हणतो…” अशी शिविगाळ मंत्र्यांनी वरिष्ठांचे सभागृह असलेल्या विधान परिषदेत केली. त्यानंतर विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तडकूब केले. (Shambhuraje Desai)

मुंबईत मराठी माणसांना घरे मिळाली पाहिजेत, यावरून आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात विधानपरिषदेत वाद झाला आहे. अनिल परब यांनी ‘गद्दार’ शब्द वापरल्याने शंभूराज देसाई संतापल्याचे पाहायला मिळाले. गद्दार कोणाला म्हणतो रे, असा संतप्त सवाल कर मंत्री शंभूराज देसाई यांनी चक्क शिवी दिली.

विधान परिषदेत  आमदार अनिल परब म्हणाले, “मराठी माणसाला घर मिळावे, हा कायदा आहे का? मग कायदा करावा ही आमची इच्छा आहे. सरकारी इच्छा फक्त सभागृहात असते. सभागृहाच्या बाहेर गेले की लोढा यांची दादागिरी सुरू होते. त्यामुळे आमची इच्छा आहे की, मंत्र्यांनी सांगावे, याबद्दल कायदा आणतो.” (Shambhuraje Desai)

“कायदा आणल्याशिवाय मराठी माणसांना न्याय मिळणार नाही. कायदा आणतो हे सांगितलं तरी मराठी माणसांना दिलासा मिळतो. मराठी माणसांना ४० टक्क्यांची अट टाकून कायदा आणणार का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शंभूराज देसाई म्हणाले, “मराठी माणसांच्या रक्षणासाठी सरकारची भूमिका आहे. अनिल परब ज्या पोटतिकडीने मराठी माणसांबद्दल भूमिका मांडताहेत, तीच आमची भूमिका आहे. पण, २०१९ ते २०२२ सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीचे धोरण घेतले होते का? अशापद्धतीचा नियम आणि कायदा तुम्ही केला होता का?” (Shambhuraje Desai)

यावेळी अनिल परब हे अचानक उठून गोंधळ घालायला लागते. तेव्हा, शंभूराज देसाई म्हणाले, “तुम्ही केले नाही, म्हणजे तुमचे पुतणा मावशीचे प्रेम आहे. याला एवढं झोंबायचे काय कारण आहे? तुम्ही केले नाही, हे ऑन रेकॉर्ड स्वीकारा…” त्यानंतर शंभूराजे देसाई आणि अनिल परब यांच्यात तणातणी पहायला मिळाली.  या गोंधळातच अनिल परब यांच्याकडून ‘गद्दार’ असा उल्लेख करण्यात आला. तेव्हा भडकलेल्या देसाई यांनी अरेतुरे करत एकेरी उल्लेख करण्यास सुरूवात केली. “काय गद्दारी सांगतो, कोणाला गद्दार म्हणतो… बाहेर ये तुला दाखवतो… तुझ्या आxxxx गद्दार कोणाला म्हणतो…” असे आव्हान दिले. सभागृहात उडालेला गोंधळ लक्षात घेऊन उप सभापती गोऱ्हे यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. (Shambhuraje Desai)

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल