मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये घसरण होत असल्याने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर शरसंधान होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.
चार डिसेंबर रोजी रुपया २८ पैशांनी घसरुन ९०.४२ पर्यंत पोचला आहे. डॉलर बळकट होत असताना आणि रुपया घसरत असताना दहा ते बारा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी मोदींनी केंद्र सरकारला “जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा” अशी टीका केली आहे. मोदींचे त्यावेळच्या वक्तव्याची आठवण करत आमदार रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांचा २०१४चा व्हिडिओही पोस्ट केला आहे. (Rohit Pawar targets Modi)
डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने नरेंद्र मोदी यांनी २०१४ पूर्वी मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी त्यावेळी म्हटले होते की, मी सुद्धा सरकारमध्ये बसलो आहे, एवढ्या वेगाने रुपया पडू शकत नाही. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेची करन्सी पडत नाही. मग काय कारण आहे, भारताचा रुपया पडण्यामागे. तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, लोक तुमच्याकडून उत्तर मागत आहेत. मात्र नरेंद्र मोदींचा हाच व्हिडीओ व्हायरल करून विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. (Rohit Pawar targets Modi)
पोस्टमध्ये रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही देश केंद्र सरकारला हेच विचारतोय..! (Rohit Pawar targets Modi)