पाटणा : देशातील लोकशाही पद्धतशीरपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा जोरदार हल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) यांनी केला. (Ravishankar attacks rahul)
जनता त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला आता मतदान करत नाही. त्यामुळेच गांधी हे बेछूट आरोपक करत आहेत, अशी टीकाही प्रसाद यांनी केली.
कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारसंघातील ६,००० हून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संसंरक्षण देत असल्याच आरोप केल्यानंतर भाजपने शुक्रवारी गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. (Ravishankar attacks rahul)
रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘‘राहुल गांधी पद्धतशीरपणे भारताची लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. का? तर जनता त्यांना मतदान करत नाही. म्हणूनच ते २०१४ च्या मोदी यांच्या निवडणुकीला बनावट म्हणत आहेत. ते २०१९ च्या निवडणुकीला फसवे म्हणत आहेत. ते २०२४ च्या निवडणुकीला फसवे म्हणत आहेत. हे सर्वजण मतांमध्ये हेराफेरी करून जिंकले आहेत, असा त्यांचा आरोप आहे. राहुल गांधी, कृपया भारतातील मतदारांचा अवमान करणे थांबवा,’’ असे प्रसाद म्हणाले. (Ravishankar attacks rahul)
बिहारमधील पाटणा येथे बोलताना प्रसाद यांनी निदर्शनास आणून दिले की २०२३ च्या कर्नाटक निवडणुकीत गांधींनी अनियमिततेचा आरोप केला आहे ज्यामध्ये त्यांचा पक्ष काँग्रेस राज्यात विजयी झाला होता. संपूर्ण यंत्रणा काँग्रेस सरकारच्या ताब्यात होती आणि तरीही ते इतरांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्तही नव्हते आणि तरीही गांधी कथित ‘मत चोरी’वरून त्यांना लक्ष्य करत होते, असेही त्यांनी नमूद केले. (Ravishankar attacks rahul)
‘‘राहुल गांधींमध्ये काय चूक आहे? ते किती खोटे बोलतील? ते तथ्ये किती विकृत करतील? मी यापेक्षा कठोर शब्द वापरू शकतो. पण राहुल गांधी, ती माझी संस्कृती नाही आणि ती माझ्या पक्षाची संस्कृती नाही. पण तुम्ही देशाच्या लोकशाहीचा विश्वासघात करत आहात, ’’ असे ते म्हणाले.