INDIAN TECHIE SHOT DEAD : भारतीय तंत्रज्ञाला अमेरिकन पोलिसांनी गोळ्या घातल्या

INDIAN TECHIE SHOT DEAD

नवी दिल्ली : रूममेटशी झालेल्या वादानंतर तेलंगणातील एका तंत्रज्ञाची अमेरिकन पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली. मोहम्मद निजामुद्दीन असे त्याचे नाव आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे घडली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयाला जबरदस्त धक्का बसला आहे. (INDIAN TECHIE SHOT DEAD)

ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी घटनेच्या १५ दिवसानंतर कुटुंबीयाला ही माहिती दिली. एअर कंडिशनरवरून झालेल्या वादात निजामुद्दीने त्याच्या रूममेटवर चाकूने वार केल्याचे वृत्त आहे.

 “एका तरुणाचा जीव गेला आहे. सर्वात वाईट म्हणजे अमेरिकन अधिकाऱ्यांना कुटुंबाची माहिती असूनही आम्हाला कळवण्यासाठी १५ दिवस लागले,” असे त्याचा धाकटे भाऊ मोहम्मद खाजा मोइनुद्दीन यांनी सांगितले. (INDIAN TECHIE SHOT DEAD)

 “आम्हाला १८ सप्टेंबर रोजी कळवण्यात आले, तर ही घटना ३ सप्टेंबरच्या सकाळी घडली. माझ्या भावाचा मृतदेह तिथे रुग्णालयाच्या शवागारात पडून आहे. काय घडले हे आमच्या पालकांना समजू शकत नाही. माझी आईला तर जबर मानसिक धक्का बसला आहे,” असे मोइनुद्दीन म्हणाला.

निजामुद्दीन २०२१ ते २०२४ पर्यंत EPAM सिस्टीम्समध्ये असताना गुगलमध्ये काम करत होता. “तो नोकरी सोडून नोकरी शोधत होता. तो अमेरिकन नागरिक असलेल्या इतर दोन रूममेट्ससोबत फ्लॅट शेअर करत होता,” अशी माहिती मोइनुद्दीनने दिली. (INDIAN TECHIE SHOT DEAD)

त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन हे निवृत्त सरकारी शिक्षक आहेत. त्यांची मोठी बहीण रोमाना फिरदौस डॉक्टर आहेत. तर मोइनुद्दीनने नुकतेच बी.टेक पूर्ण केले आहे.

निजामुद्दीन डिसेंबर २०१५ मध्ये संगणक विज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला गेला होता. २०१७ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून हे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यांनी जयप्रकाश नारायण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, महबूबनगर येथून ईसीईमध्ये बी.टेक पूर्ण केले. (INDIAN TECHIE SHOT DEAD)

 “तो आठवड्यातून एक किंवा दोनदा व्हिडिओ कॉल करत असे. त्याच्या रूममेट्ससोबत काही वाद होत असल्याने तो अनेक दिवसांपासून खूप अस्वस्थ होता, परंतु आम्हाला माहित नव्हते की ते इतके वाईट होईल. त्याने वांशिक भेदभाव, द्वेष आणि रूममेट्सकडून सतत त्रास होत असल्याची तक्रार केली. यात पोलिसांच्या सहभागाची आवश्यकता काय होती हे आम्हाला कोणीही सांगितले नाही. नेहमी स्वतःच्या कामाची काळजी घेणाऱ्या आणि इतरांशी दयाळू असलेल्या एका निष्पाप माणसाला अशा प्रकारे गोळ्या का घातल्या गेल्या? हे समजेनासे झाले आहे, असे मोइनुद्दीन म्हणाला.

Related posts

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

आमदार गायकवाडांची  ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी