Raut criticizes BJP for being a thug : ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही :  संजय राऊत

Raut criticizes BJP for being a thug

जमीर काझी :  मुंबई  :  सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही. मग, दादा किस झाड की मुली असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. “मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. महाराष्ट्र विचाराने आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत. मोर्चा विराट होणार असून महापालिकाच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे.” असेही ते पुढे म्हणाले. (Raut criticizes BJP for being a thug)

विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय प्रामाणिक मतांमुळे नव्हे, तर मतचोरीच्या संगनमतातून झाला आहे, हे सर्वश्रुत आहे, आम्ही लवकरच बोगस नावे लोकासमोर आणणार आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मंगळवारी दिली. भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’ , मतदार याद्यांतील घोटाळ्यांवर आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर तुफान हल्ला चढवला.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,’ महायुतीचा विजय प्रामाणिक मतांमुळे नव्हे, तर मतचोरीच्या संगनमतातून झाला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जवळपास एक कोटी नावे मतदार यादीत घुसडण्यात आली.त्याच्या आधारे ते पाशवी बहुमत मिळवून सत्तेत आले असे ते म्हणाले. (Raut criticizes BJP for being a thug)

खासदार राऊत म्हणाले, ,’ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं “देशावर संकट आले की लोक माझे नाव घेतात, ही बारामतीची ताकद आहे, असे केलेले विधान खरे आहे. कारण संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो हा इतिहास आहे, गेल्या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली होती. पण त्याचे पांग त्या दोघांनी कसे फेडले ते सगळ्यांनी बघितले, अशी टीका केली. (Raut criticizes BJP for being a thug)

मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढत जे लोक भ्रष्टाचार आणि पैशांचा अतिवापर करून महाराष्ट्र स्वतःच्या हातात ठेवू पाहत आहेत. त्यांचे चेहरे जनतेसमोर आणून वोटचोरी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी अख्खा महाराष्ट्र ढवळून आम्ही पुराव्यानीनिशी मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.  आता यादीमधील खोट्या मतदारांची नावं आम्ही लवकर समोर आणणार आहोत, असे सांगत शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. भाजपाचा महापौर होणार असल्याचे ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या विधानावर ते नक्की मराठी आहेत ना? त्यांना रात्री तात्या विंचू चावेल,असा टोला हाणला. (Raut criticizes BJP for being a thug)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर