मुंबई : प्रतिनिधी : पहेलगाममधील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमेवरील २० भारतीय नागरिक ठार झाले. पाकिस्तानचा बिमोड करण्याचा चंग बांधण्याचा निर्धार भारतीय सैन्याने केला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम यांच्या मध्यस्तीने शस्त्रसंधी केल्याने भारतीय सैन्य आणि जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. पाकिस्तानचे तुकडे तुकडे करु अशी घोषणा देणाऱ्यांनी युद्ध् टोकाला का नेले नाही?, पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. भाजपने त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका राऊत यांनी केली. (Raut criticize Modi)
पाकिस्तानला चीन तुर्कीने पाठींबा दिला तसा जगभर मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींना ठामपणे या युद्धात भारताला पाठिंबा देणाऱ्या एक तरी देश दाखवावा, असे आव्हानही राऊत यांनी केले. भारत पाकिस्तान युद्धात केंद्र सरकार डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्ती का स्वीकारते? असा सवाल करत त्यांच्या मध्यस्तीमुळे भारताचे नुकसान झाले आहे, असा आरोप केला. ट्रम्प यांची मध्यस्ती जगात मान्य केली जात असेल तर इस्त्रायल आणि गाझातील युद्ध ते का थांबवत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. मोदींचे मित्र असलेले ट्रम्प भारताशा पाठिशी राहिले नाहीत, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली. (Raut criticize Modi)
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती केली असे सांगण्यात येत आहे हे चुकीचे आहे. व्हाईट हाऊस आणि ट्रम्प यांची एक्स पोस्ट पाहिले तर त्यांच्या सूचनेवरुन भारताने युद्धबंदी स्वीकारली आहे. आमची माणसे मेली आहेत. आमच्या २६ महिलांचे कुंकु पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यंचा संबध काय? ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय हे मध्यस्ती कोणत्या अधिकारात करतायेत भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी जाहीर करतो. पण कोणत्या अटी शर्तीवर करत आहे असा सवाल राऊत यांनी केला. (Raut criticize Modi)
पाकिस्ताचे तुकडे तुकडे करणार अशी मोदींची भाषा होती. मग कुठे गेले तुकडे?, जगात भारताची बेअब्रु झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात आम्ही युद्ध जिंकले. भक्त अंधभक्त कुठे आहेत?. असा सवाल राऊत यांनी करत कोणत्या अटी व शर्तीवर युद्धबंदी केली यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. (Raut criticize Modi)
भागवतांनी अमित शहांचा राजीनामा मागावा
२६ महिलेचे कुंकु पुसले गेले असतानाही पहेलगाम येथे हल्ला करणारे सहा अतिरेकी अजूनही सापडले नाहीत. केंद्रीय गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार अमित शहा यांना नाही. मोहन भागवत राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी शहा यांचा राजीनामा मागितला पाहिजे असेही राऊतही म्हणाले. (Raut criticize Modi)
त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची लायकी नाही
आज इंदिरा गांधी असता तर पाकिस्तान राहिलेच नसते असे राऊत म्हणाले. इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करुन नवीन राष्ट्र निर्माण केले. पाकिस्तानच्या ९० हजार सैन्याने गुडघे टेकले. आणि ही मंडळी फक्त नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर फक्त घाणेरड्या भाषेत टीका करत आहेत. त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याचीही यांची लायकी नाही, असेही राऊत म्हणाले.