Pakistan violates ceasefire: पाकिस्तानकडून काही तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन

Pakistan violates ceasefire

नवी दिल्ली : शस्त्रसंधीला काही तासही उलटले नाहीत तोवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली होती. तिची अंमलबजावणीही तत्काळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पाकिस्तानकडून काही तासातच जम्मू-काश्मिरच्या दिशेने ड्रोन डागण्यात आले. (Pakistan violates ceasefire)

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने खंबीर भूमिका घेत ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तान हद्दीत आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्याचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन सोडण्यात आले. तेही भारतीय लष्कराने परतवून लावले. दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी शनिवारी (१० मे रोजी) दुपारी भारतीय लष्करी कारवाई महासंचालकांशी फोनवर संपर्क साधला आणि दोन्ही बाजूंनी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता गोळीबार थांबवण्यावर सहमती दर्शवली.

दरम्यान, दोन्ही देश १२ मे रोजी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश ‘‘जमिनी, हवाई आणि सागरी मार्गाने होणारे गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील.’’ (Pakistan violates ceasefire)

त्यामुळे संघर्ष आणि तणाव निवळेल, अशी अपेक्षा होती. मात्र काही तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीभंग केला.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे जम्मू शहरात मोठ्या स्फोटांचे आवाज आले. त्यामुळे भारताने सीमेवरील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर काही तासांतच ब्लॅक आउट करण्यात आला.

जैसलमेर या सीमावर्ती शहरात रात्रीच्या वेळी मोठे स्फोट झाले, तर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम राजस्थानच्या जिल्ह्यांत ब्लॅक आउट करण्यात आला. जवळजवळ एक तास स्फोटांची मालिका सुरू राहिली अशी पुष्टी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली. (Pakistan violates ceasefire) पंजाब, चंदीगड आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये, विशेषत: पंचकुला, अंबाला आणि सिरसा येथेही ब्लॅकआउट करण्यात आला. तेथे काही ड्रोनही दिसले.

हेही वाचा :
दहशतवादी कृत्ये यापुढे देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील

Related posts

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग

काँग्रेसने आयआयटी स्थापन केल्या, तुम्ही गोमुत्र, शेण गोळा करायला सांगता