मुंबई : प्रतिनिधी : मंत्री नितेश राणे यांच्या ‘भाजपाचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप’ या विधानाचे पडसाद मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप काढणे चुकीचे आहे, असं बोलणे योग्य नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Rane statement)
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर नितेश राणे यांनी मित्रपक्षांना इशारा दिला होता. कुणी कितीही ताकद दाखवली, कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा इशारा दिला होता. नितेश राणेंनी धाराशिवमध्ये सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असा इशारा मित्रपक्षांना दिला होता. तसेच कुणीही कितीही ताकद दाखवली, कोणीही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असल्याचे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले होते. (Rane statement)
आज मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत’ असे स्पष्ट केल्याचे सुत्रांनी माहिती दिली. शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाप काढणे चुकीचे असल्याचे सांगितले. याबाबत मंत्री राणे यांच्याशी चर्चा केली. तुमच्या मनात काहीही असले तरी असे बोलणे योग्य नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणेंना सांगितले असल्याचे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगून त्यांची समजूत काढली. (Rane statement)
पत्रकार परिषदेत राणेंच्या वक्तव्याबद्दल फडणवीस म्हणाले, कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. मीदेखील संबधितांची चर्चा केली. तुमच्या मनात काहीही असलं तरी असे बोलणे योग्य नाही हे त्यांना सांगितले आहे. (Rane statement)