Raj Thackeray warns : महाराष्ट्रात मस्ती कराल, तर दणका बसणारच : राज ठाकरे

Raj Thackeray warns

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशारा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी मनसेच्या मराठीतच्या समर्थमनात निघणाऱ्या मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मीरारोडला भेट दिली. (Raj Thackeray warns)

 मीरा रोड परिसरात राज ठाकरे यांच्यावर  जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथील मनसेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर सभेला संबोधित केले.

राज ठाकरे म्हणाले की, मीरा-भाईंदरला मी मुद्दाम आलो आहे. कारण त्या दिवशी मिठाईवाल्यासोबत काही तरी झालं होते. पण कानावर मराठी बसत नसेल तर कानाखाली बसणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांनी असेही म्हटले की, त्या घटनेनंतर इथल्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला. कुठल्या तरी पक्षाचे ऐकून हे संप वगैरे काढणार, दुकानं बंद करणार. पण दुकानं बंद करून किती वेळ राहणार? तुम्हाला काय वाटले, मराठी व्यापारी नाही का? महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशाराही त्यांनी दिला. (Raj Thackeray warns)

राज ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा प्रचंड मोठा लढा झाला. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करायचा गुजराती व्यापऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा डाव होता. वल्लभभाई पटेल यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, असे म्हटले होते. त्यांना आपण लोह पुरुष मानतो. आपण त्यांना आदर्श मनात होतो, पण त्यांनी आपल्या महाराष्ट्राला विरोध केला. मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारले होते. कारण या लोकांचा अनेक वर्षांपासून मुंबईवर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला. (Raj Thackeray warns)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर