Danave alleges Maha Gov : जनतेच्या प्रश्नांवर सरकारने पळ काढला : अंबादास दानवे

Danave alleges Maha Gov

मुंबई : विशेष प्रतिनिधी : सरकारवर आधी ९ लाख १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता १० लाख कोटीच्या वर गेले  आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱ्यांनी मांडून जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (१८ जुलै) केला. (Danave alleges Maha Gov)

अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत म्हणाले की,’बोगस बियांचे मोठे प्रकार घडले असताना त्याबाबत कोणताही कायदा आणलेला नाही. या अधिवेशनात बऱ्याच मंत्र्यांनी टाईमपास केला आहे. जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधातील हे सरकार कार्यभार चालविण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईचे गिरणी कामगार, शिक्षकांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था भ्रष्टाचार, शालार्थ आयडी घोटाळा आदी मुद्द्यांवर सभागृहात आवाज उठविला. (Danave alleges Maha Gov)

शक्तीपीठ महामार्ग, हिंदी सक्ती, मेघा इंजिनिअरिंगचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, मात्र सरकारने खुलासा केला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तेतील आमदारांनी वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवले. जलजिवन मिशन योजनेचा निधी अद्याप दिला नाही. उत्पादन शुल्क विभागामार्फत ३२८ परवाने देण्यात येणार आहे. १९७२ पासून सत्ताधारी आमदारांना परवाने देण्याचे बंद होते ते आता सरकारच्या काळात सुरू होणार आहे.  कॅन्टीनमध्ये चड्डी बनियान गँगने आंदोलन केले. सत्ताधारी आमदार गावोगावी गोंधळ घालत आहे.जिथे कायदे बनवले जातात ते लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनात कायदा मोडला गेल्याबाबत दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

सरकार अनेक योजनांच्या नावाखाली उधळपट्टी करत आहे. कमीत कमी महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. (Danave alleges Maha Gov)

सत्ताधारी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आरती करण्याचे काम करत होते. राज्यात दुबार पेरणी व तिबार पेरणीचे संकट आले असताना सत्ताधारी यांनी राजकीय भाषण केले. निधी अभावी अनेक विकास कामांचे कंत्राट बंद पडले आहे. निव्वळ विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत. रोज एक उद्योग राज्याबाहेर जात असताना जनतेच्या भावनांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याबाबत सरकारवर टीका केली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर