Raj Thackeray criticizes: पहेलगाम हल्ल्याचे उत्तर युद्ध असू शकत नाही

Raj Thackeray criticizes

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईबाबत देशातील सर्व पक्षाकडून स्वागत होत असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र त्याबाबत आपली वेगळी भूमिका मांडली आहे. ‘‘पहेलगामला जो हल्ला केल्या त्या दहशतवाद्यांना कठोरात कठोर आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिल असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. (Raj Thackeray criticizes)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये इलेक्शन कॅम्पेन करणे, अदानींचा सत्कार आणि मुंबईतील वेव्हज परिषदेतील उपस्थिती टाळायला हवी होती, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.  

भारतीय सैन्य दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केले नाही. त्यांनी सरळ दहशतवादी ठार मारले. दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची, आता मॉक ड्रील करायचे, सायरन वाजवायचे. हे करण्याची गरज नाही. मुळात ही गोष्ट का घडली? याचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. मुळात पाकिस्तान हा आधीच बरबाद झालेला देश आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याने काय साध्य होणार?, असा सवाल करून ते म्हणाले, ‘ज्या दहशतवाद्यांनी तुमच्यावर हल्ला केला, ते अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती? एअर स्ट्राइक करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवणे हे उत्तर होऊ शकत नाही.” (Raj Thackeray criticizes)

मॉकड्रीलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा
“सरकारच्या चूका तुम्हाला दाखवल्या पाहिजेत. ज्यावेळी हे सर्व झाले . त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. तो दौरा सोडून ते आले. बिहारला प्रचारासाठी गेले, ती गोष्ट करायची गरज नव्हती. केरळला अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले. मुंबईत वेव्हच्या समीटला आले. इतकी गंभीर परिस्थिती होती, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या, अशी टीका करून ते म्हणाले, “मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा. आज नाक्या- नाक्यावर ड्रग्स मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे’ असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा; बारा नागरीक ठार

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर