Compound Archery : भारताचे दोन्ही तिरंदाजी संघ अंतिम फेरीत

Compound Archery

शांघाय : वर्ल्ड कप स्टेज-२मध्ये भारताच्या पुरुष व महिला कम्पाउंड संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे, या स्पर्धेतील भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत. (Compound Archery)

चीनमधील शांघाय येथे ही स्पर्धा सुरू आहे. भारताच्या पुरुष संघामध्ये ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि रिषभ यादव यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये अग्रमानांकित असणाऱ्या भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या संघाला २३९-२३२ असे पराभूत केले. त्यानंतर उपांत्य लढतीत भारताने डेन्मार्कचे आव्हान २३२-२३१ असे मोडून काढले. आता सुवर्णपदकासाठी भारताची लढत शनिवारी मेक्सिकोच्या संघाविरुद्ध होणार आहे. (Compound Archery)

भारताच्या महिला संघामध्ये मधुरा धामणगावकर, चिकिता तानिपार्थी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांचा समावेश आहे. या अग्रमानांकित भारतीय संघाने महिला गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आठव्या मानांकित कझाखस्तानचा २३२-२२९ असे हरवले. भारताची उपांत्य लढत चतुर्थ मानांकित ब्रिटन संघाशी झाली. या चुरशीच्या लढतीत भारताने २३२-२३० असा विजय मिळवला. या गटातही भारताची अंतिम लढत द्वितीय मानांकित मेक्सिको संघाशी होणार आहे. (Compound Archery)

हेही वाचा :
भारत अंतिम फेरीत
रबाडाला खेळण्यास परवानगी

Related posts

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना

दिल्लीतल्या लाठीमारानं देश शुद्धीवर आलाय का ?