मुंबई : प्रतिनिधी : दोन दशकानंतर एकत्र निवडणूक लढवित असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेच्या युतीमुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांची मोठी गोची झाली आहे. तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे दोन्ही भावांची डोकेदुखी वाढली असून त्याबाबत राज यांनी मंगळवारी सायंकाळी ‘मातोश्री’ गाठीत मोठ्या भावाबरोबर सविस्तर चर्चा केली. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत बंडोबाना थंड करण्यासाठी विविध पर्याय, मुंबईसह राज्यात घ्याव्याच्या प्रचार सभा बाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. (Raj and Uddhav held discussions at Matoshree)
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट १६५, मनसे ५२ व राष्ट्रवादी शरद पवार १० जागा लढवित आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने नाराजांची संख्या वाढली आहे.काहींनी शिंदे गटात प्रवेश करीत उमेदवारी घेतली. तर अनेकांनी मातोश्रीबाहेर जमवून गोंधळ घातला. काहींनी बंडखोरीचा सूर लावल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी असल्याने, बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी बंधूंनी रणनिती ठरविण्यासाठी युती जाहीर झाल्यानंतर प्रथमच मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव यांच्याबरोबर आगामी प्रचाराची दिशा, नाराज आणि बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. (Raj and Uddhav held discussions at Matoshree)